श्रद्धाचे 35 तुकडे केलेल्या ठिकाणी सापडले 5 चाकू; 5 पुरावे शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेत. आफताब पूनावालाने ज्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची हत्या करुन तुकडे केले. त्याच ठिकाणी पोलिसांना पाच चाकू मिळालेत. तर दुसरीकडे फरिदाबादमध्ये काही मृतदेहाचे तुकडे सापडले असून, ते तुकडे श्रद्धाचे आहेत की नाही, हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाने […]
ADVERTISEMENT

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेत. आफताब पूनावालाने ज्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची हत्या करुन तुकडे केले. त्याच ठिकाणी पोलिसांना पाच चाकू मिळालेत. तर दुसरीकडे फरिदाबादमध्ये काही मृतदेहाचे तुकडे सापडले असून, ते तुकडे श्रद्धाचे आहेत की नाही, हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाने हत्येची कबुली दिली असली, तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. पोलिसांनी आफताबची पॉलिग्राफ चाचणीही केली असून, आता पोलिसांच्या हाती आफताबच्या घरातून काही पुरावे हाती लागलेत.
श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अनेक धारदार शस्त्रांचा वापर?
आरोपी आफताब पूनावालाने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार त्याने श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. आता आफताबने अशी कबुली दिलीये की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याने एकापेक्षा अधिक शस्त्राचा वापर केलाय. पोलिसांनी आफताबच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर 5 चाकू सापडले आहेत.
आफताबच्या फ्लॅटमध्ये सापडलेले चाकू हे घरात वापरले जाणारे नसून, त्यांची लांबी 5 ते 6 इंच इतकी आहे. पोलिसांनी हे चाकू जप्त करून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. फॉरेन्सिक टीमच्या तपासणीतून या चाकूचा वापर मृतदेह कापण्यासाठी झालाय की नाही हे समोर येणार आहे.