Odisha: आई शप्पथ! अंपायरने ‘नो बॉल’ देताच चाकूने भोकसले; मैदानावर थरार

मुंबई तक

Crime News: क्रिकेट सामन्यादरम्यान ‘नो बॉल’ देण्याचा निर्णय अंपायरच्या जीवावर बेतला आहे. कारण एका तरुणाने मैदानाताच अंपायरची धारदार चाकूने हत्या केल्याची घटना ओडिसामध्ये घडली आहे.

ADVERTISEMENT

stabbed for umpire giving no ball in cricket match odisha
stabbed for umpire giving no ball in cricket match odisha
social share
google news

Orissa Umpire Murder : भुवनेश्वर : ओडिशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील क्रिकेट मैदानाचे रणांगणात रूपांतर झाले. अंपायरला ‘नो बॉल’ देण्याचा निर्णय जीवाशी आला. एका तरुणाने धारदार चाकूने त्याची हत्या केली. क्रिकेटच्या मैदानावरचं हत्येची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक केली. (Stabbed for umpire giving no ball; The incident happened in the field itself)

Crime : मन सुन्न करणारी घटना! पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच झोपला पती…

हे प्रकरण कटकमधील महिशिलंदा गावाशी संबंधित आहे. येथे क्रिकेटचा सामना सुरू होता. यादरम्यान पंचांनी ‘नो बॉल’चा निर्णय दिला. हा निर्णय आरोपीला अमान्य होता. म्हणून तो संतप्त झाला. लकी राऊत (22, रा. महिशिलांदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. स्मृती रंजन राऊत असं या आरोपीचं नाव आहे.

अशी झाली मावळमधील शिरगावच्या सरपंचांची हत्या; काय आहे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, महिसलंदा येथे ही स्पर्धा सुरू होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर हे दोन्ही संघ शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळत होते. ब्रह्मपूर संघाविरुद्ध पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने वाद सुरू झाला. पंचाच्या या निर्णयामुळे गावातील स्मृती रंजन राऊत नावाचा तरुण संतापला. त्याने पंचाशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू वाद वाढत गेला.

पुण्याच्या मावळमध्ये भर बाजारात सरपंचाची हत्या, CCTVमध्ये थरार कैद

दरम्यान, स्मृती रंजन याने मैदानातच चाकू काढला. आणि एकामागून एक पंचांवर चाकूने वार करू लागला. चाकूच्या हल्ल्यात पंच गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान पंचाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण पसरले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यासोबतच गावात सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp