14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार! पीडितेने मुलीला दिला जन्म अन् आरोपी मिठाई घेऊन थेट...

मुंबई तक

एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटनेबद्दल कळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

ADVERTISEMENT

अल्पवयीन पीडितेने मुलीला दिला जन्म अन्...
अल्पवयीन पीडितेने मुलीला दिला जन्म अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

point

आरोपी मिठाई घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला अन्...

Crime News: उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटनेबद्दल कळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अल्पवयीन पीडितेने जिल्ह्यातील बीडी पांडे रुग्णालयात मुलीला जन्म दिला. यानंतर, पोलिसांच्या चौकशीदरम्यान मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

संबंधित मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात असून तो अल्मोडा जिल्ह्यातील शीतलाखेत येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने एका मुलीला जन्म दिल्याचं आरोपी तरुणाला तिने सांगितलं. त्यावेळी, संबंधित तरुण लगेच रुग्णालयात पोहोचला आणि तिथे त्याने मिठाई वाटण्यास सुरूवात केली. दरम्यान, रुग्णालयाच्या प्रशासनाकडून पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. 

डॉक्टरांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर...

त्यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीला घेऊन रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता त्यांना मोठा धक्का बसला. अल्पवयीन मुलीची तपासणी करताना ती गरोदर असल्याचं समोर आलं. दरम्यान, पीडितेची नॉर्मल डिलीव्हरी झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. 

हे ही वाचा: बॉयफ्रेंडने फोन करून खोलीत बोलवलं! काही वेळानंतर तीन मित्रसुद्धा आले अन् घडलं असं काही की...

फेसबुकच्या माध्यमातून झाली ओळख

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, सूरज तीन वर्षांपासून नोकरीच्या शोधात नैनीतालमध्ये आल्याची माहिती समोर आली. तिथे तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. जवळपास दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्याची अल्पवयीन पीडितेसोबत ओळख झाली. त्यानंतर, कालांतकाने दोघांमधील संवाद वाढू लागला आणि काही दिवसांनंतर, आरोपीने मुलीचं लैंगिक शोषण केलं. दरम्यान, पीडिता गर्भवती राहिल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp