नवरा नाइट ड्यूटीवरून परतला, पत्नीने नको ते केलं... पतीच्या पायखालची जमीनच सरकली!

मुंबई तक

एका महिलेने तिच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आरोपी महिलेने नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

नवरा नाइट ड्यूटीवर असताना पत्नीने उचललं भयानक पाऊल!
नवरा नाइट ड्यूटीवर असताना पत्नीने उचललं भयानक पाऊल!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा नाइट ड्यूटीवर असताना पत्नीने उचललं भयानक पाऊल!

point

सकाळी घरी येताच दिसलं 'ते' दृश्य

point

नेमकं काय घडलं?

Crime News: कर्नाटकातील शिवमोगा येथे एका महिलेने तिच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आरोपी महिलेने नंतर स्वत: गळफास घेऊन जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरणाच्या प्राथमिक तपासात संबंधित महिला मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे ग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. याच कारणामुळे आरोपी महिलेनं हे टोकाचे पाऊल उचलले असावं, असा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याची माहिती आहे. संबंधित 38 वर्षीय महिलेने आधी तिच्या 12 वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावून आयुष्य संपवून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

नवरा नाइट ड्युटीवरून घरी परतला

शिवमोगा सरकारी रुग्णालयातील नर्स म्हणजेच परिचारिकांच्या क्वार्टरमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात काम करणारा एक लॅब टेक्निशियन त्याच्या नाइट ड्युटीवरून घरी परतला आणि त्यावेळी त्याला संबंधित महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह आढळला. 

हे ही वाचा: हनीमूनच्या दिवशी नवऱ्याने बेडरूममध्ये लावला हिडन कॅमेरा, प्रायव्हेट व्हिडीओ बनवून दुबईच्या मित्रांना पाठवला अन्...

मुलीची हत्या अन् स्वत: घेतला गळफास

प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव श्रुती असं असून ती तिच्या पती आणि मुलीसोबत राहत होती. महिलेचा पती नाइट ड्युटीवर असताना श्रुतीने आपल्या मुलीच्या डोक्यावर वार केले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. इतकेच नव्हे तर, मुलीच्या हत्येनंतर महिलेनं गळफास घेतल्याचं बोललं जात आहे. सकाळी आरोपी महिलेचा नवरा कामावरून परतला तेव्हा त्याला दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला आणि त्याला त्याची मुलगी पूर्विका हिचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर खोल जखमा होत्या आणि त्याच्या पत्नीचा म्हणजेच श्रुतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, पूर्विका ही सहावीत शिकणारी विद्यार्थिनी होती, अशी माहिती आहे. 

हे ही वाचा: सातारा : काकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं, गरोदर असल्याचं समजताच कोयना धरणाच्या किनारी...

पोलिसांचा तपास 

प्राथमिक तपासानुसार, श्रुती ही मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होती. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात हत्या आणि अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे असून यासंबंधी बरेच पैलू विचारात घेऊन तपास सुरू केला असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp