मोठा मुलगा उद्धट, आईकडून अतिलाड, पती मानसिक रुग्ण बनला; अखेर कऱ्हाडीने...
Crime News : मोठा मुलाच्या उद्धट वागण्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मोठा मुलाची आईसोबत जवळीक वाढली

पती मानसिक रुग्ण बनला; अखेर कऱ्हाडीने वार करुन पत्नीला संपवलं
Crime News : पतीने कुऱ्हाडीचे वार करुन बायकोची निर्घुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बायकोचा खून केल्यानंतर हा आरोपी पती फरार झालाय. स्वप्ना असं मृत्यू महिलेचं नाव असून पती असलेला नरेश या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. ही घटना तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील अलेरू गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
अधिकची माहिती अशी की, नरेश आणि स्वप्ना यांना दोन मुलं आहेत. दाम्पत्य किराणा दुकान आणि चिकन सेंटर चालवत होते. काही काळापासून त्यांचा परिवार आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे घरात सतत भांडणं आणि कलह सुरू झाले होते. मोठा मुलगा आई-वडिलांशी वाईट पद्धतीने वागत होता. यामुळे पती-पत्नीमधील मतभेद आणखी वाढले.
हेही वाचा : पत्नी करायची नको ते काम! पतीला भनक लागताच नातेवाईकांसोबत मिळून रचला मोठा कट अन् नंतर...
दोघांमध्ये नेहमी वाद होत असतं
आरोपी नरेशला हळूहळू आपल्या पत्नीवर संशय येऊ लागला होता. त्याचं वागणं मानसिक रुग्णासारखं झालं होतं. प्राथमिक तपासात पोलिसांना समजलं की पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होत असत. मोठा मुलगा अधिक हट्टी आणि उद्धट होत चालला होता. तो आई-वडिलांचं ऐकणं बंद केलं होतं, आणि त्याचं कारण त्याची आईसोबतची जवळीक होती, असं बोललं जात आहे.