Crime News : शेजाऱ्याच्या घरात कुलरमध्ये सापडला मुलाचा मृतदेह, तारेने बांधलेले हात-पाय

मुंबई तक

ADVERTISEMENT

5 year old boy who went to study tution found in coller madhya pradesh
5 year old boy who went to study tution found in coller madhya pradesh
social share
google news

Dead Body Found in cooler : ट्युशनसाठी एक 5 वर्षाचा चिमुकला घरातून निघाला होता. मात्र ट्युशनवरून (tution) परतण्याचा वेळ निघून गेली तरीही तो परतलाच नव्हता. त्यामुळे कुटुंबियांनी चिमुकल्याची खुप शोधा शोध केली मात्र तो सापडला नाही. नंतर अखेर प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनंतर घटनास्थळी पोहोचताच कुटूबियांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी कुटूंबियांनी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनंतर पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनाक्रमाने संपूर्ण राज्य हादरलंय.(a 5 year old boy who went to study tution found in coller shocking incident from madhya pradesh)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

भिंड परिसरात राहणारा 5 वर्षाचा गुल्लु त्रिपाठी अचानक गायब झाला होता.गुल्लु बुधवारी ट्यूशनासाठी (Tution) घरून निघाला होता मात्र परतलाच नव्हता. त्यामुळे कुटुंबियांना चिंता वाटत होते. खरं तर गुल्लू घराशेजारीच राहत असलेल्या अटल चौरसिया यांच्याकडे ट्युशनसाठी जायचा. मात्र तो घरी परतला नसल्याने कुटूंबिय चिंतेत होते. त्यामुळे वडिल सुशील आणि त्याची पत्नी गुल्लुचा शोध घेण्यासाठी ट्युशन टीचर अटल चौरसिया यांच्या घरी गेले होते. मात्र ट्युशन टीचरने गुल्लु ट्यूशन करून घरी गेल्याचे सांगितले होते. त्यामुळे नेमका गुल्लू गेला तरी कुठे? असा प्रश्न कुटूंबियांना पडला होता. ट्युशन टीचरकडे गुल्लु सापडत नसल्याने इतर ठिकाणी त्याचा शोध सुरु करण्यात आला होता.

हे ही वाचा : दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच महिलेवर झाडल्या गोळ्या

प्रत्यक्षदर्शीमुळे घटनेचा उलगडा

गु्ल्लुचा खुपच शोध घेऊन सुद्धा कुटूंबियांना तो सापडला नव्हता. त्यामुळे नेमकं गुल्लुसोबत काय झालंय अशी भिती कुटुंबियांना वाटत होती. या दरम्यान एक प्रत्यक्षदर्शी समोर आला होता. त्याने गुल्लुच्या कुटुंबियांना ट्युशन टीचर अटल चौरसिया याच्या बाजूलाच राहणाऱ्या संतोष चौरसिया यांच्याकडे गेल्याची माहिती दिली होती. ही माहिती मिळताच कुटूंबिय तत्काळ संतोषच्या घरी पोहोचले होते.

हे वाचलं का?

कुलरमध्ये सापडला गुल्लु

कुटूंबियांनी संतोषच्या घरी जाऊन गुल्लुचा शोध सुरु केला. यावेळी संतोषच्या दुसऱ्या माळ्यावरील घराला टाळा लागला होता. वडिल सुशील म्हणाले की, जेव्हा संतोषला घर दाखवायला सांगितले, तेव्हा त्याने सांगितले बघा काही नाही आहे. त्यानंतर घरातील वरच्या माळ्यावर टाळा लावला होता. हा माळा देखील खोलायला लावला. हा रूम उघडताच संतोषचा मोठा मुलगा जाऊन कुलरच्या समोर उभा राहिला. जेव्हा गुल्लुच्या आईने त्याला कुलरपासून बाजू व्हायला सांगितले, तेव्हा त्याने म्हटले कुलरमध्ये काही नाही आहे. मात्र नंतर आईने जवळ जाऊन पाहिले तर कुलरमध्ये गुल्लु होता. गुल्लुचे हात-पाय बांधून त्याला त्यात ठेवले होते.गुल्लुची अशी अवस्था पाहून कुटूंबियांनी तत्काळ रूग्णालयाकडे धाव घेतली. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. यानंतर कुटूंबियांनी संतोष चौरसिया आणि त्याची पत्नी आणि मुलांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : हृदयद्रावक : कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात सापडली भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेली अर्भकं

एक छोटा मुलगा होता, जो ट्युशनसाठी घरातून निघाला होता. जेव्हा तो घरी परतला नाही तेव्हा त्याचा शोध घेण्यात आला. या मुलाचा मृतदेह शेजाऱ्याच्याच घरी कुलरमध्ये सापडला. या प्रकरणी संतोषची पत्नी आणि मुलांना ताब्यात घेण्यात आले असून संतोष अद्याप फरार आहे, दरम्यान या प्रकरणात चिमुकल्या गुल्लुची हत्या का करण्यात आली? याचा तपास अद्याप सुरु आहे,अशी माहिती एसडीओपी अवनीश बंसल यांनी दिली आहे. ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.या घटनेने संपूर्ण गावं हादरलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT