Akola Crime : ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Akola Crime News : अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेत ठाकरे गटाच्या नेत्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाकरे गट आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल

अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल
Akola Crime News : धनंजय साबळे, अकोला : अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यात भाजपच्या महिला सरपंच डॉ. कल्पना पळसपगार यांनी केलेल्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (akola crime news atrocity register against district head shiv sena udhhav thackeray group)
अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुजरूक गावाच्या भाजपच्या सरपंच डॉ. कल्पना पळसपगार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. कल्पना पळसपगार यांनी तक्रारीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर ठाकरे गटाच्या गोपाल दातकर यांच्यावर ॲट्सिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : Vidhan Parishad election : 'शरद पवारांचेच मत फुटले', जयंत पाटलांच्या पराभवाचे कारण समोर
प्रकरण काय?
भाजपच्या सरपंच डॉ. कल्पना पळसपगार आणि गोपाल दातकर यांच्यात दोनच दिवसांपूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बाचाबाची झाली होती. या दरम्यान डॉ. पळसपगारांनी तक्रारीत दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
हिंगणी बुजरूक हे गोपाल दातकरांचं गाव आहे. भाजपने जाणीवपुर्वक या गुन्ह्यात आपल्याला अडकवल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केला. दातकर अकोला पूर्व विधानसभेसाठी ठाकरे गटाचे दावेदार आहेत. गुन्हा का दाखल केला? याचा जाब विचारण्यासाठी आमदार नितीन देशमुखांनी आज पोलीस अधिक्षकांची भेट घेतलीय. या प्रकरणाची आठवडाभरात चौकशी करून खरे तथ्य शोधावे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. याविरोधात प्रसंगी जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देशमुखांनी दिलाय.