34 वर्षांची सासू अन् 24 वर्षांचा जावई, अनिता आणि राहुलच्या प्रकरणाचीच तुफान चर्चा

मुंबई तक

Aligarh News: अलीगढमधील पळून गेलेल्या सासू आणि जावयाची चर्चा सुरु असतानाच त्याबाबतीत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यादरम्यान, पळून गेलेली महिला आणि आरोपी तरुणाचं वय किती? याबद्दलची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

सीसू आणि जावयाबद्दल नवी माहिती समोर
सीसू आणि जावयाबद्दल नवी माहिती समोर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अलीगढमधील सासू आणि जावयाचे प्रेमप्रकरण

point

पळून गेलेल्या सासू आणि जावयाच्या केसमधील नवीन अपडेट

point

पळून गेलेल्या सासू आणि जावयाचं वय किती?

Aligarh News: अलीगढमधील पळून गेलेल्या सासू आणि जावयाची चर्चा सुरु असतानाच त्याबाबतीत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. होणाऱ्या जावयाच्या म्हणजेच राहुलच्या वडिलांनी त्याला संपत्तीमधून बेदखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या वडिलांच्या मते, या घटनेमुळे आणि मुलाच्या वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. अशात, मुलाशी नातं ठेवण्यात काहीच अर्थ नाही. राहुल त्याच्या घरातून काही पैसे आणि दागिने घेऊन गेल्याचं राहुलच्या वडिलांनी सांगितलं. यादरम्यान, पळून गेलेल्या सासू आणि जावयाचं वय किती? याबद्दलची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहिलेचे वय 34 वर्ष असून आरोपी तरुणीचे वय 24 वर्ष आहे. 

बऱ्याच नातेवाईकांकडून चौकशी

अलीगढचे DSP महेश कुमार यांनी सांगितले की राहुलच्या नातेवाईकांची आणि मित्रांची चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप यातून काही ठोस माहिती मिळाली नाही. अलीगढमधील मडराक पोलिसांनी उत्तराखंडातील रूद्रपूरचे रहिवासी राहुलचा मेहुणा, त्याचे वडील आणि  इतर कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी बोलावले. दरम्यान, पोलिसांना त्याच्या मेहुण्यावर सर्वात मोठा संशय आहे की त्याने राहुलला पळून जाण्यास मदत केली असावी कारण ते दोघेही नुकतेच उत्तराखंडमध्ये भेटले होते. DSP महेश कुमार यांच्या मते, अजून चौकशी आणि दोघांचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा: 'सासूने जावयावर जादू केली अन्, त्याला आपल्या...' आता समोर आली भलतीच माहिती

शेरवानी घेण्याचं कारण सांगून घरातून निघाला

लग्नाची शेरवानी घेण्यासाठी राहुल त्याच्या मेहुण्याकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, राहुल त्याच्या मेहुण्याकडे गेलाच नसल्याचे त्याच्या मेहुण्याने सांगितलं आहे. तसेच, "त्याने घरातून निघण्यापूर्वी काय सांगितले, याबद्दल मला काहीच माहित नाही", असे राहुलच्या मेहुण्याचे स्पष्ट मत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुलच्या मेहुण्याने या प्रकारणात पोलिसांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यास नकार दिला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp