16 वर्षीय मुलीच्या मागे लावला लग्नासाठी तगादा, नकार देताच चिरला गळा; 19 वर्षीय व्यंकटेशला अटक

मुंबई तक

आरोपी तरुण 16 वर्षीय मुलीचा छळ करत होता आणि तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होता. ती केवळ आपल्या पालकांच्या पसंतीच्या व्यक्तीशीच लग्न करेल, असे मुलीने स्पष्टपणे सांगितल्यानंतरही त्याने तिचा छळ करणे थांबवले नाही. शेवटी जे नको तेच घडलं.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

16 वर्षीय मुलीच्या मागे लावला लग्नासाठी तगादा

point

नकार देताच चिरला गळा

point

19 वर्षीय व्यंकटेशला अटक

Crime News : आंध्र प्रदेशमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे कडप्पा जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने लग्नासाठी नकार दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलीच्या नकारानंतरही छळ

पोलिसांनी माहिती दिली की, अतिरक्तस्रावामुळे मुलीचा मृत्यू झाला, तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्यंकटेश असे आरोपीचे नाव असून तो 16 वर्षीय मुलीचा छळ करत होता आणि तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होता.ती केवळ आपल्या पालकांच्या पसंतीच्या व्यक्तीशीच लग्न करेल, असे मुलीने स्पष्टपणे सांगितल्यानंतरही त्याने तिचा छळ करणे थांबवले नाही.

हे ही वाचा : अंबरनाथ: सिमरनचं बॉससोबत सुरु होतं 'गुटरगू', ब्रेकअपनंतर नैराश्यात येऊन हॉटेलच्या खोलीत गळफास घेत संपवलं जीवन

एकटी असल्याचे पाहून घरात शिरला

शुक्रवारी (10 मार्च) सकाळी जेव्हा मुलीचे आई-वडील घराबाहेर गेले होते आणि ती घरी एकटीच होती, तेव्हा व्यंकटेश जबरदस्तीने घरात घुसला आणि याच कारणावरून तिच्याशी भांडण करू लागला. त्यांच्यातील वाद वाढल्यानंतर त्याने खिशातील चाकू काढला आणि मुलीचा गळा चिरला. मुलगी मदतीसाठी ओरडली आणि जमिनीवर कोसळली, तेव्हा व्यंकटेशने घटनास्थळावरून पळ काढला. 

हे ही वाचा : हिंगोली: अशी आई असल्यापेक्षा नसलेली बरी, प्रियकराच्या नादी लागून पोटच्या लेकराला संपवलं

अतिरक्तस्रावामुळे मृत्यू

शेजाऱ्यांनी मुलीला तातडीने रुग्णालयात नेले आणि तिला कडप्पा येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये हलवण्याची तयारी सुरू असतानाच अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी कडप्पा येथे पाठवला, त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हे वाचलं का?