Buldhana Crime : वासनांध शिक्षकाने आठवीतील विद्यार्थिनीवर वर्गातच केला बलात्कार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

buldhana crime news teacher molest 8th standard school girl viral private photos crime story
buldhana crime news teacher molest 8th standard school girl viral private photos crime story
social share
google news

Buldhana crime News : बुलढाण्यात गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका नराधम शिक्षकाने (School Teacher) आठवीत शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीला (Girl Student) वासनेचे शिकार बनवलं आहे. शिक्षकाने विद्यार्थीनीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape Case) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थीनीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी (Police) आरोपी शिक्षकाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (buldhana crime news teacher molest 8th standard school girl viral private photos crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बुलढाण्यातील जिल्हा परीषद शाळेत शिकवणाऱ्या एका 41 वर्षीय शिक्षकाने विद्यार्थीनीचे लैगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. पिडीत तरूणी ही आठवीची विद्यार्थीनी आहे. या विद्यार्थीनीचे काही खाजगी फोटो शिक्षकाजवळ होते.हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी शिक्षक पिडीत तरूणीवर बलात्कार करत होता.

हे ही वाचा : कोब्राचं विष, ड्रग्ज, तरुणी; एल्विश यादवच्या पार्टीत काय असतं? मित्राने सांगितली Inside Story

तसेच जर या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारेन अशी धमकी देखील आरोपी शिक्षकाने विद्यार्थीनीला दिली होती. या धमकीच्या बळावर आरोपी शिक्षकाने अनेकदा विद्यार्थीनीला वासनेला शिकार बनवून तिच्यावर बलात्कार केला. शिक्षकाच्या या धमकीपायी विद्यार्थीनीही निमुटपणे हा अत्याचार सहन करत होती.

हे वाचलं का?

दरम्यान या प्रकरणी आता विद्यार्थीनीने बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विद्यार्थीनीने जिल्हा परिषद शाळेच्या 41 वर्षीय शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये पीडितेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नावाखाली शिक्षकाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे आणि धमकी दिल्याचे म्हटले आहे. तसेच तिच्या पालकांना ठार करण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : Glenn Maxwell च्या द्विशतकाची कमाल! अफगाणिस्तानच्या हाता-तोंडाशी आलेला विजय आणला खेचून

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT