‘आशिक’ने घेतला गर्लफ्रेंडचा जीव, व्हॉट्सअॅप स्टेटसला…; रूम नंबर 201 मध्ये काय घडलं?
चेन्नईमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलने प्रेमाच्या नात्याला पुन्हा एकदा काळीमा फासला आहे. हॉटेल रूममध्ये बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची हत्या केली आणि पुढे जे केलं ते धक्कादायक होतं.
ADVERTISEMENT

Crime News : फार कमी लोक असतात, ज्यांना आयुष्यात खरं प्रेम मिळतं. बहुतेक लव्हस्टोरी अर्धवटच राहतात. तर काही लव्हस्टोरींचा शेवट भयंकर होतो. जसं दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड आणि इतर काही प्रकरणं. तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्येही (Chennai Crime News) असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे. येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलने प्रेमाच्या नात्याला पुन्हा एकदा काळीमा फासला आहे. हॉटेल रूममध्ये बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची हत्या केली आणि पुढे जे केलं ते धक्कादायक होतं. (Chennai Crime News Man Killed His Girlfriend in hotel room and upload her photo on whatsapp Status)
हत्येनंतर आरोपी बॉयफ्रेंडने मृतदेह त्याच हॉटेलच्या खोलीत सोडला, जिथे त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. याहून भयानक म्हणजे हत्येनंतर त्याने गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचा फोटो त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट केला. जेव्हा त्यांच्या काही कॉमन फ्रेंड्सनी हा स्टेटस पाहिला तेव्हा त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
वाचा : Telangana Election Result : ”BRS चे आमदार काँग्रेसच्या संपर्कात”, के.सी. राव यांचं वाढलं टेन्शन
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. ना खुनाबद्दल, ना खुन्याबद्दल. पोलिसांनी प्रत्येक हॉटेल आणि लॉजची झडती घेण्यास सुरुवात केली, कारण मृत तरूणीच्या एका मित्राने त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपची माहिती पोलिसांना दिली होती.
रूम नंबर 201 मागे दडलेलं रहस्य काय?
यावेळी, शहरातील क्रोमपेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील खोली बऱ्याच वेळापासून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तातडीने त्या हॉटेलमध्ये पोहोचले. तेथे रुम नंबर 201 उघडली असता सर्वजण थक्क झाले. पोलीस ज्या मुलीचा शोध घेत होते तिचा मृतदेह समोरच बेडवर पडला होता. हॉटेल मॅनेजरने सांगितले की, केरळमधील कोल्लम येथे राहणारी फौजिया तिचा बॉयफ्रेंड आशिकसोबत येथे राहण्यासाठी आली होती.