Crime : मालकाच्या हत्येनंतर मृतदेह पुरला अन् त्यावर… घृणास्पद प्रकाराने पोलिसही हादरले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Brutal murder of the shop owner by a servant with the help of his friend in Mumbai
Brutal murder of the shop owner by a servant with the help of his friend in Mumbai
social share
google news

Crime News :

ADVERTISEMENT

मुंबई :मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने मालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना टिटवाळ्यात घडली आहे. सचिन माम्हाने असं मयत मालकाचं नाव आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी सुनील मौर्या या नोकरासह त्याचे साथीदार शुभम गुप्ता आणि अभिषेक मिश्रा यांना बेड्या ठोकल्या आहेत.(Brutal murder of the shop owner by a servant with the help of his friend in Mumbai)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कल्याणजवळील टिटवाळा परिसरात सचिन म्हामाने यांच्या पत्नीचे इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिकचे दुकान आहे. 7 एप्रिल रोजी सचिन कामानिमित्त बाहेर गेले ते घरी परतले नाही. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात सचिन बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस देखील त्यांचा शोध होते.

हे वाचलं का?

बिग बॉस फेमला अटक; 500 किलोमीटर पाठलागानंतर बेड्या : काय घडलं नेमकं?

तपासादरम्यान, बदलापूर दहागाव रोडवर सचिन यांची गाडी तोडफोड केलेल्या अवस्थेत आढळून आली. आजुबाजूला पोलिसांनी शोध घेतला असता सचिन यांचा मृतदेह दहागाव येथील निर्जनस्थळी पुरलेल्या अवस्थेत आढळला. हत्या केल्यानंतर आरोपींनी सचिन यांचा मृतदेह पुरुन त्यावर मृत म्हैस टाकली होती. मात्र दोन दिवसानंतर मृतदेह फुगून हात बाहेर आला अन् पोलिसांचा नजरेस पडला. प्राथमिक तपासात ओढणीने गळा आवळून सचिन यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. मात्र त्यांची हत्या का व कुणी केली याचा उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते.

Instagram वर मैत्री, 5 वर्ष शारीरिक संबंध अन् अचानक पाठवले मोबाइलवर ‘ते’ Video…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि गुन्हे प्रगतीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता तपासादरम्यान दुकानात काम करत असलेला सुनील मौर्या याने आपले साथीदार अभिषेक मिश्रा व शुभम गुप्ता यांच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ या तिघांचा माग काढत तिघांनाही बेड्या ठोकल्यात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT