मुलीने बोलण्यास नकार दिल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाची सटकली, थेट तरुणीवर गोळी झाडली
Crime News : मुलीने बोलण्यास नकार दिल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाची सटकली, थेट तरुणीवर गोळी झाडली
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बऱ्याच दिवसांची मैत्री बिनसली
मुलीने बोलण्यास नकार दिल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाची सटकली
Crime News : एकतर्फी प्रेमातून गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने डुंडाहेडा गावात गुरुवारी सकाळी ऑफिसला जात असलेल्या तरुणीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जखमी तरुणीला तात्काळ सेक्टर-10 येथील नागरिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून तरुणीने त्या तरुणाशी बोलणे बंद केले होते. यामुळे रागाच्या भरात त्याने ही घटना घडवून आणली.
बोलण्यास नकार दिल्याने तरुणाने गोळी झाडली
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील ही तरुणी गुरुग्रामच्या उद्योग विहार फेज-4 परिसरातील एका खासगी कंपनीत काम करते. ती डुंडाहेडा परिसरात भाड्याच्या घरात राहत होती. रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले की, गुरुवारी सकाळी 10 वाजता ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती आणि खोलीबाहेर येऊन चप्पल घालत होती. त्याच वेळी तिने यूपीच्या जौनपूर जिल्ह्यातील 33 वर्षीय विपिनला पाहिले.
तक्रारीत तरुणीने म्हटले आहे की, आरोपी विपिनने तिला जबरदस्तीने आत खोलीत येण्यास सांगितले. तिने नकार दिला असता, त्याने पिस्तूल दाखवून धमकी दिली. “आत नाही आलीस तर गोळी मारीन,” असे म्हणून त्याने गोळी झाडली. गोळी तरुणीच्या खांद्यावर लागली. समजते की, तरुणी आणि आरोपी यांच्यात पूर्वी मैत्री होती.
एकतर्फी प्रेमातून हिंसक होऊन तरुणाचं कृत्य
गेल्या काही दिवसांपासून तरुणीने विपिनशी संपर्क तोडला होता. त्याचाच राग मनात धरून त्याने ही घटना घडवली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी एकतर्फी प्रेमात वेडा होऊन या हिंसक कृत्यापर्यंत पोहोचला. घटनेची माहिती मिळताच उद्योग विहार पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त केली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, तरुणीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.









