अनैतिक संबंधात ठार वेडी झाली, प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या चिमुकल्या मुलीचा काटा काढला
Crime News : अनैतिक संबंधात ठार वेडी झाली, प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या चिमुकल्या मुलीचा काटा काढला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनैतिक संबंधात ठार वेडी झाली
प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या चिमुकल्या मुलीचा काटा काढला
Crime News : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दिवाळ सणाचा उत्साह सुरु असताना एका निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, ही हत्या इतर कुणी नव्हे तर स्वतः त्या मुलीच्या आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान दोघांनीही कबूल केले की, त्यांच्या प्रेमसंबंधांच्या आड ही मुलगी येत होती.
हेही वाचा : PSI कडून 5 महिने अत्याचार, नातेवाईकांकडूनही गंभीर आरोप, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे
ही घटना मवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखनीपूर गावातील आहे. पूजा नावाच्या महिलेचे लग्न देशराज नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. देशराज मुंबईत मजुरीचे काम करतो. लग्नानंतर लवकरच दोघांमध्ये वाद सुरू झाले. याच काळात पूजाचे गावातीलच सत्यनाम नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पूजाने एका मुलीला जन्म दिला. पण हीच मुलगी तिच्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरू लागली. त्यामुळे वैतागून 19 ऑक्टोबर रोजी पूजाने आपल्या प्रियकर सत्यनामसोबत मिळून त्या निष्पाप मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर हा प्रकार लपवण्यासाठी पूजाने कुटुंबीयांना खोटे सांगितले.
मात्र नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असता, अहवालात गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. कडक चौकशीदरम्यान पूजाने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी आई आणि प्रियकराला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांनी सांगितले की, हत्येमागे कौटुंबिक वाद आणि प्रेमसंबंधातील तणाव हे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.









