मुलगा होण्यासाठी विवाहित सादिकचे गर्लफ्रेंडसोबत संबंध, बाळ जन्मताच प्रेयसीची हत्या
Crime News : मेरठमध्ये शेतात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख शीबा म्हणून पटली असून, तिची हत्या प्रियकर सादिकने कुटुंबीयांसह केल्याचा पोलिसांचा दावा आहे. मुलाच्या इच्छेतून शीबाला सोबत ठेवण्यात आले आणि मुलाच्या जन्मानंतर तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलगा होण्यासाठी विवाहित सादिकचे गर्लफ्रेंडसोबत संबंध
बाळ जन्मताच प्रेसयीसीची हत्या
Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केल्याचा दावा केला आहे. 20 ऑगस्ट रोजी सरधना परिसरातील एका शेतात महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब होती. महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा होत्या. चेहऱ्यावर विटेने अनेक वेळा वार करण्यात आल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मृत महिलेची ओळख भावनपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील सयाल गावातील शीबा अशी पटली. 21 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याचे फोटो पाहिल्यानंतर शीबाचे कुटुंबीय सरधना पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर शवागारात मृतदेहाची ओळख शीबा म्हणून करण्यात आली.
हेही वाचा : भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मृत्यू, पण घरात 30 लाखांची रोकड, नेमकं प्रकरण काय?
आधीच पाच मुली, मुलगा हवा म्हणून गर्लफ्रेंडसोबत संबंध
पोलिसांच्या माहितीनुसार, शीबाचा विवाह 2019 मध्ये कंकरखेडा पोलीस ठाणे क्षेत्रातील लाला मोहम्मदपूर येथील शाहरुखसोबत झाला होता. त्यांना दोन मुले होती. शाहरुख गाझियाबाद येथील एका कारखान्यात मजुरी करत होता. याच काळात शीबाची सादिकसोबत जवळीक वाढली आणि ती सादिकसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. सादिक आधीपासून विवाहित होता आणि त्याला पहिल्या पत्नी आशियापासून पाच मुली होत्या. पोलिसांच्या तपासानुसार, सुरुवातीला सादिकच्या कुटुंबीयांनी शीबाला सोबत ठेवण्यास विरोध केला. त्यानंतर सादिक काही काळ कुटुंबापासून वेगळा राहू लागला. काही दिवसांनी तो पुन्हा कुटुंबाकडे परतला आणि त्याला मुलगा नसल्याने मुलाच्या इच्छेने त्याने शीबाला सोबत ठेवल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर सादिकच्या कुटुंबीयांनी शीबाला स्वीकारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुमारे एक वर्षापूर्वी शीबाने एका मुलाला जन्म दिला.
हेही वाचा : 13 वर्षांपूर्वी मृत घोषित केलेला आरोपी जिवंत सापडला; न्यायालयाने तुरुंगात पाठवलं
