नवविवाहितेच्या घरासमोर CCTV, बाथरुम आणि शौचालय दिसायचं.. नंतर 9 जणांकडून पाशवी बलात्कार

मुंबई तक

Crime news : एका महिलेच्या घरासमोरच सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेचं शौचालय आणि बाथरुम दिसत होतं. अशा स्थितीत घरात कोणीही पुरुष नव्हते. परिणामी, महिलेला तसेच तिच्या सुनेनं सीसीटीव्हीबाबतची चिंता व्यक्त केल्यानंतर सुनेवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सीसीटीव्हीत महिलेचं शौचालय दिसलं

point

नऊ जणांकडून सुनेवर लैंगिक अत्याचार 

Crime news : उत्तर प्रदेशातील बदोही जिल्ह्यातील ज्ञानपूर कोतवाली भागातील एक महिला तिच्या सुनेसह तिच्या घरात एकटीच राहत होती. पण, 12 मार्च रोजी घडलेल्या एका घटनेनं पूर्ण परिसर हादरून गेला आहे. अरुण दुबे, वरुण दुबे, अंकित दुबे,  सुमित दुबे, अमन दुबे, संदीप दुबे, सौरभ दुबे, अनुज दुबे आणि संजय दुबे हे तिच्या घरासमोर राहत होते. 

हे ही वाचा : 42 वर्षीय पुरुषाचा 33 वर्षीय महिलेशी विवाह, हनीमूनच्या रात्रीच भलतंच घडलं

सीसीटीव्हीत महिलेचं शौचालय दिसलं

त्याच्या घरासमोरच सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेचं शौचालय आणि बाथरुम दिसत होतं. अशा स्थितीत घरात कोणीही पुरुष नव्हते. परिणामी, महिलेला तसेच तिच्या सुनेनं सीसीटीव्हीबाबतची चिंता व्यक्त केली. या सीसीटीव्हीमुळे त्यांना असुरक्षितता वाटू लागली. त्यांनी दुबे कुटुंबाकडे या सीसीटीव्हीच्या निर्णयाचा निषेध दर्शवला आहे. पण, संबंधितांनी या प्रकरणात जे काही केलं ते अगदीच आश्चर्यकारक असल्याचं बोललं जातंय.

नऊ जणांकडून सुनेवर लैंगिक अत्याचार 

महिलेनं दावा केला की, तिने आणि तिच्या सुनेनं सीसीटीव्ही कॅमेऱ्याला विरोध केला असता, दुबे कुंटुंबाने संताप व्यक्त केला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अरुण दुबे, अंकीत दुबे, सुमित दुबे, अमन दुबे, संदीप दुबे, सौरभ दुबे, संजय दुबे यांनी तिला आणि तिच्या सुनेला खाली ओढत ढकलले. त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले. हे बघून महिलेनं आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परिस्थिती बघता घटनास्थळी रहिवाशांनी धाव घेतली. आरोपीने महिलेला आणि तिच्या सुनेला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. 

हे ही वाचा : पत्नीचं बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचा पतीला संशय, क्रिकेटच्या बॅटनेच केला प्राणघातक हल्ला, महिलेला जागेवरच केलं ठार

या प्रकरणाबाबत महिलेने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp