Pune: मुलीने दिलेल्या नकारामुळे नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, पुण्यात नेमकं काय घडतंय?

हर्षदा परब

Pune Crime: तरूणीने लग्नासाठी दिलेला नकार जिव्हारी लागल्याने एका तरूणाने मुलीची बदनामी करण्यासाठी चक्क पुण्यातील नेत्यांनाच धमक्या देण्याचा उपद्व्याप सुरू केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

ADVERTISEMENT

death threats to pune leaders due to girls refusal to marry
death threats to pune leaders due to girls refusal to marry
social share
google news

पुणे: दिलजला आशिक भडकला आणि राजकीय नेत्यांना धमक्या देत सुटला. राजकीय व्यक्तींना विशेषतः पुण्यातल्या राजकीय नेत्यांना त्याने टार्गेट करणं हा त्याच्या गुन्ह्याचा पॅटर्न होता. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचे त्यामुळे काही दिवस धाबे दणाणले होते. कोण होते हे नेते, हा दिलजला आशिक काय करायचा? आणि भाजप, मनसे आणि काँग्रेसचे नेते त्याच्या तावडीतून कसे सुटले याबाबत आपण जाणून घेऊया सविस्तर. (death threats to pune leaders due to girls refusal to marry what is actually happening in pune)

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, भाजपचे आमदार महेश लांडगे, भाजपचे गणेश बिडकर मुरलीधर मोहोळ असे सर्व पक्षीय नेते चिंतेत होते. कारणच तसं होतं कोणाला जीवे मारण्याची धमकी आली होती तर कोणाच्या नावे खंडणी वसुलीची माहिती समोर आली होती. या सर्व नेत्यांबाबत घडलेल्या घटनेचा पॅटर्न होता. हा पॅटर्न लक्षात घ्यायला हवा कारण आरोपी त्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

आरोपी एकतर्फी प्रेमातून करत होता भयंकर कृत्य

भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार आणि भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देत 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. लांडगेंनी मतदारसंघातील नागरीकांच्या मदतीसाठी सुरु केलेल्या परिवर्तन या हेल्पलाईन नंबरवर 4 एप्रिलला त्यासाठी मेसेज आला. पैसे दिले नाही तर डोक्यात गोळी घालून जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती. अज्ञात इसमाकडून हा मेसेज आला होता. लांडगे यांच्याकडे काम करणाऱ्या यश पवारने याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

माजी मंत्री रमेश बागवेंच्या मुलाला धमकी

काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आणि माजी नगरसवेक अविनाश बागवे यांनाही अशीच धमकी मिळाली होती. 4 एप्रिलला दुपारच्या वेळेस अविनाश बागवे घरी असताना त्यांना आधी एक फोन आला आणि त्यानंतर मग मेसेज आला. 30 लाख रुपयांची खंडणी त्यांच्याकडे मागितली होती. आणि पैसे दिले नाहीत तर गोळी मारुन हत्या करण्याची, राजकीय कारकिर्द उध्वस्त करण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp