Crime News : दिल्ली मेट्रो कर्मचाऱ्याने आधी बायको-मुलाची केली हत्या, नंतर…
दिल्लीच्या ज्योती कॉलनीत राहणाऱ्या सुशील (43) यांनी पत्नी अनुराधा (40) आणि 6 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली. सुशीलने 13 वर्षाच्या मुलाचा देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने तो या घटनेतून बचावला होता.
ADVERTISEMENT
Delhi Shahdara Murder Suicide case : दिल्ली एका कुटुंबाच्या हत्याकांडाने हादरलं आहे. या घटनेत दिल्ली मेट्रोचा कर्मचारी असलेल्या पित्याने आधी बायको आणि मुलाची हत्या केली, आणि नंतर स्वत: फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात एक 13 वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला आहे. या हत्याकांडाने संपूर्ण दिल्ली शहर हादरलं आहे. आर्थिक विवंचनेतून पित्याने संपू्र्ण कुटुंब संपवल्याचा दावा नातेवाईक करताय़त. मात्र या प्रकरणात नेमकं हत्या आणि आत्महत्येमागचं कारण काय आहे? याचा पोलिस तपास करतायत.(delhi shahdara murder suicide case father killed his wife and children)
ADVERTISEMENT
…म्हणून उचललं टोकाचं पाऊल
दिल्लीच्या ज्योती कॉलनीत राहणाऱ्या सुशील (43) यांनी पत्नी अनुराधा (40) आणि 6 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली. सुशीलने 13 वर्षाच्या मुलाचा देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने तो या घटनेतून बचावला होता. सध्या तो रूग्णालयात मृत्यूशी झूंज देतोय. कुटूंबियांना मृत्यूच्या दरीत लोटल्यानंतर पित्याने देखील फासावर लटकून आत्महत्या केली.कुटुंबियांच्या हत्या आणि आत्महत्या प्रकरणानंतर परिसरात हळहळ व्यक्त होतेय. दिल्ली मेट्रोच्या ईस्ट विनोद नगर डेपोमध्ये मेंटेनेंस सुपरवायझरची नोकरी करणाऱ्या सुशीलच्या या टोकाच्या निर्णय़ाने नातेवाईकांसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आर्थिक विवंचनेतून सुशीलने असा टोकाचा निर्णय़ घेतल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर सुशीलच्या कुटूबियांनी हे कारण फेटाळले आहे.
हे ही वाचा : लखीमपूर खेरी प्रकरण: फसवणूक, बलात्कार, खून आणि एन्काउंटर…जाणून घ्या घटनेची इनसाईड स्टोरी
मित्राला केला शेवटचा कॉल
सुशीलने आत्महत्येपूर्वी ऑफिसचा मित्र सुधीरला फोन केला होता. या फोन कॉलवर ‘सर्व काही संपलय’ असे म्हणत सुशील रडत होता. सुशीलने मला हत्येची माहिती दिली आणि कॉल कट केल्याचे सुधीरने पोलिसांनी सांगितले. यानंतर सुशीलला अनेकदा फोन केला मात्र त्याने उचलला नाही. तसेच सुधीरने त्याला पोलिसात जाण्याचा सल्ला देखील दिला होतास,असे सुधीर म्हणतोय.
हे वाचलं का?
सुशीलच्या एका नातेवाईकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी सुशीलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तसेच घटनास्थळी सुशीलचा डेस्कस्टॉप स्लीपमोडवर सापडला. ज्यावेळी पोलिसांनी की बोर्डचे बटण दाबले तेव्हा एक व्हिडिओ प्ले झाला. हा व्हिडिओ गळफास लावण्याचा होता.त्यामुळे सुशीलने फास लावण्यापुर्वी फासावर कसे लटकायचे याचा व्हिडिओ इंटरनेटवर पाहिलाला होता.
हे ही वाचा : बापानं न्यायासाठी ४२ दिवस लेकीचा मृतदेह ठेवला मिठात; अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेची सत्यता काय?
पोलिसांचे म्हणणे काय?
सुशील हा आर्थिक समस्येचा सामना करत होता. घटनास्थळावरून जी कागदपत्रे सापडली आहेत, या कागदपत्रानुसार, सुशील आर्थिक समस्येचा सामना करत होता हे स्पष्ट होत आहे. यातूनच त्याने दागिने गहाण टाकले होते, त्याच्यावर मोठं लोन देखील होतं, अशी माहिती शाहदराच्या डीसीपी रोहित मीना यांनी दिली. तसेच सुशील यांचा फोन फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला आहे. सुशील पत्त्यांमध्ये तर पैसे हरला नाही ना? याचाही पोलीस तपास करतायत. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस करतायत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT