Dombivali: माणुसकीला काळीमा…नातवाला भेटायला गेलेल्या सासूला अर्धनग्न करून मारहाण
दोन दिवसांपूर्वी अजय आपल्या मुली आणि मुलाला भेटण्यासाठी आपल्या सासरवाडीत गेला होता. मात्र त्या ठिकाणी त्याला आपल्या मुली आणि मुलाला भेटून दिले नाही. यानंतर त्याच्या मेहुण्याने आपल्या काही मित्रांना बोलावून अजयला बेदम मारहाण केली.
ADVERTISEMENT
Dombivali Crime News : डोंबिवली पूर्व भोईरवाडी खांबलपाडा या परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या बापाला आणि बापाच्या आईला बेदम मारहाण झाल्याची दुदैवी घटना डोंबिवलीत घडली आहे.धक्कादायक बाब म्हणजे सूनेकडच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली होती. या घटनेची व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आता टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे.
(dombivali crime news daughter and family beaten mother in law meet her grandson dombivali shocking story)
ADVERTISEMENT
डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या अजय कुशवाहा यांच्या पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादामुळे कुशवाह यांची पत्नी आपल्या मुली आणि मुलासोबत आपल्या आई- वडिलांच्या घरी म्हणजेच माहेरी राहायला गेली होती. बायको मुलांसह माहेरी राहायला गेल्याने कुशवाह प्रत्येक महिन्याला आपल्या मुलांना काही पैसै द्यायचा. या दरम्यान पती-पत्नीमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया देखील सूरू होती.
हे ही वाचा : ‘जरांगे-पाटील.. तुम्हाला फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे..’, राज ठाकरेंना नेमकं म्हणायचं तरी काय?
दोन दिवसांपूर्वी अजय आपल्या मुली आणि मुलाला भेटण्यासाठी आपल्या सासरवाडीत गेला होता. मात्र त्या ठिकाणी त्याला आपल्या मुली आणि मुलाला भेटून दिले नाही. यानंतर त्याच्या मेहुण्याने आपल्या काही मित्रांना बोलावून अजयला बेदम मारहाण केली. यावेळी अजयला वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या अजयची आईला देखील महिलांनी आणि पुरुषांनी बेदम मारहाण केली.
हे वाचलं का?
विशेष म्हणजे या मारहाणी दरम्यान अजयच्या आईचे कपडे फाटले गेले होते. त्यामुळे तिला कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण सुरू होती. या दरम्यान नागरीकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अमानुषपणे मारहाण करण्यात विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरते आहे.
हे ही वाचा : Maratha Reservation : ‘मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल केली’, उल्हास बापटांनी दाखवली ‘ही’ चूक
या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या अजयची आईवर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच टिळक नगर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करणाऱ्या गणेश सिंग, अरविंद सिंग, नयना देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात टिळक नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT