आई बॉयफ्रेंडसोबत दिसली ‘त्या’ अवस्थेत; नंतर घडलं थरारक कांड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mother kill her own daughter
Mother kill her own daughter
social share
google news

Mother kill her own daughter : देशभरात विवाह बाह्य संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.या वाढत्या घटनांमुळे गुन्हयांचे प्रमाणही वाढले आहे. अनेकदा या नात्यात पत्नी अथवा पती अडसर ठरत असतो, त्यामुळे त्यांच्या हत्येच्या बातम्या समोर येत असतात, तर काही प्रकरणात मुलांचाही अडसर येतो. त्यामुळे या नात्याखातर त्यांचाही बळी जातोच.अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत आई आणि तिच्या बॉयफ्रेंडने (Boyfriend) मिळून निष्पाप मुलीची हत्या केल्याची घटना घडलीय. ही घटना उजेडात येताच संपुर्ण गाव हादरलं. (extra marital affair mother end daughter life with boyfriend shocking incident from uttar pradesh)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

या घटनेत अश्वनी कुमार दुबे यांची 5 वर्षांची मुलगी सोहनी 4 एप्रिलच्या संध्याकाळी बेपत्ता झाली होती. आई राधा दुबे यांनी अश्वनी यांना या घटनेची माहिती दिली होती. यानंतर कुटूंबियांनी तिची खुप शोधाशोध केली, मात्र ती काय सापडली नाही. अखेर वडिल अश्वनी यांनी पोलीसांकडे (police) मदत मागण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता. या दरम्यान पोलिसांना दुसऱ्याच दिवशी एका जुन्या रूग्णालयामागे तिचा मृतदेह (Dead Body) सापडला होता. हा मृतदेह सापडताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती. अवघ्या 5 वर्षाच्या मुलीची कोण हत्या करेल असा प्रश्न उपस्थित होत होता.

हे ही वाचा : ‘प्रेम एकतर्फी नसतं’, असं म्हणत शिक्षा भोगत असलेल्या तरुणाने जेलमध्ये गळफास लावला

पोलिसांना (police) मृतदेह सापडल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तत्काळ समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी अनेक अॅगलने घटनेचा तपास सुरु केला होता. या प्रकरणात संशयाच्या आधारावर पोलिसांनी अश्वनी यांचा शेजारी नेत्रपालला ताब्यात घेतले होते.यावेळी नेत्रपालला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिली होती. नेत्रपाल आणि राधा दुबेला तिने त्या अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे विवाह बाह्य संबंधाचा भंडोफोड होऊ नये यासाठी दोघांनी मिळून तिची हत्या केली होती.

हे वाचलं का?

पोलीस (police) या प्रकरणात सुरुवातीला बाहेरील आरोपीचा शोध घेत होती. मात्र नंतर त्यांना चौकशीत मोठा धक्काच बसला. कारण या प्रकरणात आई राधा दूबेनेच पोटच्या पोरीचा गळा आवळून खुन केला होता. या प्रकरणात तिला बॉयफ्रेंड नेत्रपालने मदत केली होती. या घटनेचा उलगडा होताच पोलिसांनी आई राधा दूबे आणि बॉयफ्रेंड नेत्रपाल यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा : गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 25 लाख हुंडा… विमानतळावर पोहोचताच नवऱ्याने काढला पळ

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जालोनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण गावाला धक्का बसला होता.या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यभरात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT