पोटची पोरगी जिवंत असतानाच माय-बाप घालणार तेरावं, असं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

family declare daughter as dead and distribute cards for death feast bhirwara rajasthan
family declare daughter as dead and distribute cards for death feast bhirwara rajasthan
social share
google news

सोशल मीडियावर काही दिवसांपुर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत प्रियकरासोबत पळून चाललेल्या मुलीला (Daughter) रोखण्यासाठी बापाने (Father) तिच्यासमोर जमीनीवर नाक घासले होते, पाया पड्ल्या होत्या आणि हात देखील जोडले होते. मात्र बापाच्या या विनवणीला भीकही न घालता तरूणीने प्रियकरासोबत पळ काढला होता. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत देखील तरूणीने प्रियकरासोबत पळ काढला होता. त्यानंतर कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी (Police) तिचा शोध घेत कुटुंबियांसमोर उभे केले होते.मात्र तरूणीने ओळखण्य़ास नकार दिल्यानंतर कुटुंबियांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. (family declare daughter as dead and distribute cards for death feast bhirwara rajasthan)

ADVERTISEMENT

तरूणीचा कुटुंबियांना ओळखण्यास नकार

राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.रतनपुरा ग्रामच्या प्रिया जाटने कुटुबियांच्या विरोधात जाऊन गावातल्या तरूणासोबत पळ काढला होता. विशेष म्हणजे हा तरूण तिच्याच जातीचा होता. तरूणी पळून गेल्यानंतर कुटुंबियांनी पोलीस (Police) ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध मोहिम राबवून तरूणीचा शोध घेत कुटुंबियांसमोर उभे केले होते. यावेळी कुटुंबियांसमोर उभे करताच तरूणीने त्यांना ओळखण्यासच नकार दिला. आणि पुन्हा एकदा तरूणासोबत ती पळून गेली.

हे ही वाचा : ‘ऑफिसमध्ये काम न करता मी मिळवते लाखो रुपये…’, तरुणी मग नेमकं करते तरी काय?

13 व्याचीच पत्रिका छापली

तरूणीच्या (Daughter) अशा वागण्याचा कुटुंबियांना प्रचंड संताप झाला आहे. त्यामुळे कुटुबियांनी प्रिया आजपासून आमच्यासाठी मेली असल्याचे जाहिर केले आहे. यासोबत तिच्या नावाचा एक शोक संदेश देखील छापला आहे. दरम्यान कुटुंबियानी प्रियाला मृत जाहिर केल्यानंतर ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शोक जाहिर करत तरूणीच्या 13 व्याच्या जेवणाचीच निमंत्रण पत्रिका म्हणजेच श्राद्ध पत्रिका छापली होती. या पत्रिकेत कुटुंबियांनी लिहले की, 1 जुन 2023 रोजी प्रियाचे निधन झाले आहे. तिच्या तेराव्याचे जेवण येत्या 13 जून रोजी घालण्यात येणार आहे. तसेच यानिमित्त उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.

हे वाचलं का?

दरम्यान आता कुटुंबियांनी जीवंत तरूणीसाठी छापलेल्या शोक संदेशाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या शोक संदेशाचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शोक संदेशाच्या फोटोवर भन्नाट लाईक्स आणि कमेंट येत आहेत. त्यासोबत अनेक नेटकरी यावर तरूणीला दोष देत आहेत, तर काहींनी कुटुंबियांना मोलाचा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा : Gorakhpur Crime: भयंकर.. तरुणीने बॉयफ्रेंडच्या आईला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, कारण…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT