Crime : धक्कादायक! प्रेयसीच्या मैत्रिणीने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा, कारण…
कानपूरमधून (Kanpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत प्रेयसीच्या मैत्रिणीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिल्याने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट (Private part) कापल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला असता ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Boyfriend Private Part Cut : कानपूरमधून (Kanpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत प्रेयसीच्या मैत्रिणीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिल्याने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट (Private part) कापल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला असता ही घटना घडली आहे. या घटनेनंतर प्रियकराला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सूरू आहेत. यासोबत या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. (girlfriend friend cut married boyfriend private part kanpur uttar pradesh crime story)
ADVERTISEMENT
कानपूरच्या चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रौतापूर गावात ही घटना घडली आहे. या घटनेतील प्रियकर याचे पहिले लग्न झाले होते. या लग्नानंतर देखील त्याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध सुरु होते. या संबंधातून प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रविवारी रात्री तिच्या घरी गेला होता. या दरम्यान प्रेयसीच्या घरी तिची मैत्रिण देखील उपस्थित होती. यावेळी प्रेयसीच्या मैत्रिणीने प्रियकरासोबत संबंध ठेवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी प्रियकराने फेटाळली होती. त्यामुळे प्रेयसीची मैत्रिण प्रियकरावर रागावली होती.
हे ही वाचा : MP Election: भाजपचं ‘बंगाल पॅटर्न’! केंद्रीय मंत्री, खासदारांना का दिली विधानसभेची तिकीटं?
त्याचं झालं असं की प्रेयसीच्या मैत्रिणीने तिच्या प्रियकरासोबत संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. मैत्रिणीच्या या दबावाला बळी न पडता प्रियकराने तिला विरोध केला. या विरोधामुळे रागावलेल्या मैत्रिणीने प्रियकराला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीनंतर मैत्रिणीने प्रियकराचा प्रायव्हेट पार्टचाच चावा घेतला होता. यानंतर जखमी अवस्थेत प्रियकराने कसं बस करून आपले घर गाठले होते.
हे वाचलं का?
घरी आल्यावर प्रियकराच्या पत्नीला या घटनेची माहिती मिळताच तिने लगेच पोलिसांना कळवले.पोलिसांनी यावेळी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, प्रियकराला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर त्याला कानपूर शहरातील एक रूग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या प्रियकराची प्रकृती नाजूक असून त्याच्यावर उपचार सूरू आहेत.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी प्रियकराकडे पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली. मात्र प्रियकराने लाजेपोटी नकार दिला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा अधिकचा तपास सुरु आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sharad Pawar: ‘मोदींचं ते वक्तव्य क्लेशदायक’, पवारांची घणाघाती टीका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT