हॉटेलवर गेले, रोमान्स केला, छुप्या कॅमेऱ्यात…, कपलसोबत घडला भयंकर प्रकार
अमेरीकेच्या हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे बसवण्यात आले होते.या छुप्या कॅमेऱ्यात त्यांचा रोमान्स कैद झाला होता. हा संपूर्ण प्रकार कपलला कळताच त्यांच्या पायाखालचीच जमीन सरकली आहे. या प्रकरणी आता कपलने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याचसोबत या हॉटेल मालकाला कोर्टात देखील खेचले आहे.
ADVERTISEMENT
आजची तरूणाई रोमान्स करण्यासाठी हॉ़टेलचा वापर करते. मात्र हॉटेलचा वापर करणे एका कपलला चांगलेच महागात पडले आहे. कारण या कपलने जो हॉटेल निवडला होता. त्या हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे बसवण्यात आले होते.या छुप्या कॅमेऱ्यात त्यांचा रोमान्स कैद झाला होता. हा संपूर्ण प्रकार कपलला कळताच त्यांच्या पायाखालचीच जमीन सरकली आहे. या प्रकरणी आता कपलने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याचसोबत या हॉटेल मालकाला कोर्टात देखील खेचले आहे. नेमके या प्रकरणात काय घडले आहे? हे जाणून घ्या. (hidden camera in hotel room couple private moment record in camera america story)
ADVERTISEMENT
एनवायटी रिपोर्टने दिलेल्या माहितीनूसार अमेरीकेच्या टेक्सासमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत काइली गेट्स त्याची होणारी बायको क्रिश्चियम कॅपेरा या कपलने मेरीलॅंड येथील एअरबीएनबी कंपनीत हॉटेलमध्ये रूम घेतला होता. रूम पाहताच त्यांना तो आवडला कारण हॉटेलमध्ये अत्याधुनिक सुविधा होत्या. यावेळी हॉटेमलमध्ये त्यांनी रोमान्स केला एकमेकांसोबत वेळ घालवला. त्यांचा हा संपूर्ण खाजगी क्षण हॉटेलमध्ये लावलेल्या कॅमेरात कैद झाला होता.मात्र या प्रकाराची त्यांनी काहीच कल्पना नव्हती.
हे ही वाचा : Delhi Builder Wife Murder: जिममध्ये मैत्री, भररस्त्यातच हत्या; मोबाइलमध्ये खुनाचं ‘राज’?
दरम्यान दोघेही बेडवर पडले असताना त्यांना घरात स्मोक डिटेक्टर लावलेले दिसले. घरात दोन-दोन स्मोक डिटेक्टर लावण्यात आले होते. एक रूममध्ये होता, तर दुसरा बाथरूममध्ये होता. त्यामुळे कपलला संशय बळावला. यावेळी त्यांनी या स्मोक डिटेक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना एक छुपा कॅमेरा आढळला. या कॅमेरात त्यांचे खाजगी क्षण कॅमेरात कैद झाले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ रूम सोडण्याचा निर्णय़ घेतला त्याचसोबत स्थानिक पोलीस मोंटगोमरी काऊंटी पोलिसात याबाबतची तक्रार दिली.
हे वाचलं का?
पण हॉटेल मालकाने रूममध्ये कॅमेरा लावण्याचा आरोप फेटाळला. कोणत्यातरी ग्राहकाने हे कृत्य केल्याने त्याने म्हटले आहे. तसेच हॉटेल मालकाने या संपूर्ण प्रकरणात सहकार्य करण्याचे पोलिसांना आश्वासन दिले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच कपलचा खाजगी व्हिडिओ व्हायरल झाला आहे की नाही? याचा तपास करण्यात येत आहे.
हे हॉटेल दोन भावांचे आहे. घटनास्थळी उपस्थित असलेला हॉटेल मालक या प्रकरणात सहकार्य करत आहे. तर त्याचा भाऊ सहकार्य करत नाही आहे.तसेच त्याने त्याच्या रूमची झाडाझडती घेऊन दिली नाही. त्यामुळे लिसांना त्याच्या भावावर संशय बळावला आहे. कपलने या प्रकरणात आता हॉटेल मालकाला कोर्टात खेचले आहे. आता या प्रकरणात कोर्ट हॉटेल मालकाला काय शिक्षा सुनावते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime : वहिनी किचनमध्ये गेली अन् दिराने दरवाजा लावला, घडलं भयंकर कांड
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT