Husband-Wife: ‘नवऱ्याने बेडरूममध्ये लावलाय CCTV कॅमेरा’, बायको म्हणाली; त्याला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

husband put the cctv camera in the wifes bedroom What does husband see in cctv from bedroom to bathroom wife complains to police against husband
husband put the cctv camera in the wifes bedroom What does husband see in cctv from bedroom to bathroom wife complains to police against husband
social share
google news

MP Chhatarpur Wife Bedroom: मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एका महिलेने तिच्या पतीवर आरोप करत म्हटले आहे की, ‘माझा नवरा माझ्यावर संशय घेतो, म्हणून त्याने माझ्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) लावला आहे. हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे जो शौचालय देखील कव्हर करतो.’ महिलेने केलेल्या या आरोपामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. पण महिलेच्या पतीने नेमकं असं का केलं याबाबत महिलेने गंभीर आरोप केले आहेत. (husband put the cctv camera in the wifes bedroom What does husband see in cctv from bedroom to bathroom wife complains to police against husband)

ADVERTISEMENT

पतीवर असा आरोप करत महिलेने एसपी कार्यालयात तक्रार अर्ज देताना कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सीताराम कॉलनीत राहणारा अमित (नाव बदलले आहे) जो शिक्षक आहे. तर जिल्ह्यातील मुकरवा गावातील शाळेत तैनात आहे.

पती-पत्नी एकाच घरात वेगवेगळ्या खोलीत

महिलेला संशय आहे की तिचा शिक्षक पती अमित (बदलेले नाव) याचे शाळेतील एका महिला शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध आहे. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये नेहमीच वाद होतात. त्यामुळे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले असून, ते न्यायालयात प्रलंबित आहे. असं असताना नवरा-बायको हे एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या

पोलीस करत आहेत तपास

महिलेने असाही आरोप केला आहे की, ‘पती अमित (नाव बदलले आहे) याची अशी इच्छा आहे की, मी मुलांसह घर सोडून जावं. जेणेकरून त्याला दुसरे लग्न करता येईल. त्यामुळेच तो मला वेगवेगळ्या हेतूने त्रास देतो, माझा छळ करतो.’ अशा सर्व आरोपांबाबत महिलेने एसपी कार्यालयात तक्रार दाखल करून तिच्या पतीवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावरून पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.

अनैतिक संबंधांत अडसर ठरला, आईने प्रियकरासह पोटच्या पोरालाच संपवलं

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने एका महिलेने तिच्या प्रियकरासह स्वत:च्याच पोराची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनीा सांगली जिल्ह्यातील लेंगरे येथील आईसह जोंधळखिंडीत राहणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे विटा पोलिसांच्या पथकाने अवघ्या 2 दिवसात या संपूर्ण प्रकाराचा छडा लावला होता.

ADVERTISEMENT

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील ज्योती प्रकाश लोंढे (वय 28) या विवाहितेचे जोंधळखिंडी येथील रुपेश नामदेव घाडगे (वय 25) सोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात ज्योती लोंढे या विवाहितेचा 6 वर्षाचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे आईने प्रियकरासह मुलाच्या हत्येचा कट रचला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> पोलीस जावयाला, पोलीस सासऱ्याने घडवली जन्मभराची अद्दल.. आता भोगावी लागणार जन्मठेप!

या घटनेत ज्योती लोंढेच्या मदतीने रुपेश हा शौर्यला आपल्या दुचाकीवरून घेऊन गेला. यानंतर ढोराळे रस्त्यावरील एका विहिरीत शौर्यला फेकून देण्यात आले. यानंतर शौर्यचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर विटा पोलीसांना या प्रकाराबाबत संशय आला होता. त्यानुसार विटा पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेल्या पोलीस निरीक्षक यादव यांच्या पथकाने या घटनेचा तपास सुरू केला. त्यानुसार तपासात अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात आईची कसून तपास केला असता या घटनेचा उलगडा झाला. आईने पोटच्या मुलाच्या अपहरणाचा डाव रचला आणि प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

ADVERTISEMENT

follow whatsapp

ADVERTISEMENT