Sangli Crime: ज्ञानेश्वरी वाचत बसलेले डॉक्टर… सख्ख्या भावाने गळाच चिरला!
देवासमोर ज्ञानेश्वरी वाचत बसलेल्या सख्ख्या मोठ्या भावाची लहान भावानेच गळा चिरुन हत्या केली आहे.
ADVERTISEMENT

Sangli Crime :सांगली : येथील कुपवाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. देवासमोर ज्ञानेश्वरी वाचत बसलेल्या सख्ख्या मोठ्या भावाची लहान भावानेच गळा चिरुन हत्या केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याच सांगण्यात येत आहे. डॉ. अनिल बाबाजी शिंदे (४३) असे मृत भावाचे नाव आहे. तर संपत बाबाजी शिंदे (३५) असं आरोपी भावाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. याबाबत कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (In Sangli, the elder brother was killed by his younger brother by slitting his throat)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कुपवाड येथील मिरज रस्त्यालगत एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये अनिल शिंदे हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. बुधवारी (26 एप्रिल) सकाळी नेहमीप्रमाणे शिंदे घरात ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. तर त्यांच्या पत्नी नाष्ट्याची तयारी करत होत्या. अचानक संपत शिंदे हातात धारदार विळा घेऊन आला आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
नवरा अचानक घरी आला, बायको 15 वर्षाच्या मुलासोबत होती ‘त्या’ अवस्थेत…
‘अन्या कुठे आहे, असे विचारत तो देवासमोर ज्ञानेश्वरी वाचत बसलेल्या अनिल शिंदे यांच्या दिशेने धावला. नेमकं काय होतयं हे कळण्याच्या आतच संपत शिंदेने अनिल शिंदे यांच्या गळ्यावर धारदार विळ्याने हल्ला केला.7 ते 8 घाव वर्मी बसल्याने अनिल शिंदे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले. घडलेला प्रकार बघून घाबरेल्या पत्नीने मुलांना घेऊन खोली बाहेर पडत आरडाओरडा केला आणि पतीचा जीव वाचविण्यासाठी इतरांकडे मदत मागण्यास सुरुवात केली.
मात्र लोक गोळा होण्यापूर्वीच संशयित संपत शिंदे पसार झाला. दरम्यान, परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेतील पडलेल्या डॉ. शिंदे यांना कुपवाड संघर्ष समितीच्या रुग्णवाहिकेमार्फत मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र घाव वर्मी बसल्याने अनिल शिंदे मयत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.









