पतीसोबत हनिमूनला आलेली बायको, इंटरव्हल होताच थिएटरमधूनच झाली फरार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

jaipur bride who came on honeymoon with her husband disappeared fro theatre during interval
jaipur bride who came on honeymoon with her husband disappeared fro theatre during interval
social share
google news

राजस्थानच्या जयपूरमधून (Jaipur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका नववधूने लग्नाच्या सातच दिवसात पळ काढल्याची घटना घडली आहे. या घटनेने नवऱ्याला मोठा धक्का बसला आहे. खरं तर लग्न झालेले हे जोडपं हनीमुनला गेले होते. या दरम्यानच संधी साधून नवरीने पळ काढला होता. या घटनेनंतर नवऱ्याने पोलिस ठाण्यात (Police) धाव घेऊन नवरीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीनंतर नवरीच्या पळ काढण्याचे जे कारण समोर आले ते पाहून नवऱ्याला मोठा धक्काच बसला आहे. (jaipur bride who came on honeymoon with her husband disappeared fro theatre during interval)

मिळालेल्या माहितीनूसार, सीकरचा निवासी असलेल्या एका युवकाने सातच दिवसांपूर्वी लग्न केले होते. या लग्नानंतर 3 जून रोजी हा तरूण आपल्या नववधूला जयपूरला (Jaipur) हनीमूनसाठी घेऊन गेला होता. या हनीमूनसाठी त्यांनी हॉटेलमध्ये रूम देखील बुक केला होता. या हनीमून दरम्यान तरूणाने जयपूरमधील पिंक स्क्वॉयर मॉलमध्ये पत्नीसोबत सिनेमा पाहण्याचा प्लान बनवला होता. त्यानुसार दुपारी 12 वाजताच्या शोचे तिकिट देखील बुक केले होते.

हे ही वाचा : धक्कादायक! नर्सशी संबंध ठेवताना रूग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

इंटरव्हलमध्ये काढला पळ

ठरल्यानुसार दोघेही सिनेमागृहात पोहोचले होते, येथे दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घालून सिनेमे पाहिले. या दरम्यान दुपारी 1.30 वाजता सिनेमाचा इंटरवल झाला होता. या इंटरवलमध्ये पती पत्नीसाठी खायला घेण्यासाठी बाहेर पडला. याच संधीचा फायदा घेऊन नववधूने सिनेमागृहातून पळ काढला होता. यानंतर ज्यावेळेस पती पुन्हा सिनेमा गृहात पोहोचला तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला. कारण त्याची बायको सीटवर बसलेलीच दिसलीच नाही. या दरम्यान त्याने बायकोला फोन करण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिचा फोन स्विच ऑफ येत होता. या दरम्यान नववधूसोबत काही भयानक घडले असल्याच्या भीतीने पतीने पोलिस ठाण्य़ात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तरूणाची बायको जी काही तासांपूर्वी बेपत्ता झाली होती तिने जयपूरचे शाहपूरा पोलिस ठाणे गाठले. यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. मी या लग्नापासून खुश नाही आहे, आणि सिनेमागृहात मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन मी पळ काढला होता,असे धक्कादायक कारण तिने पोलिसांना सांगितले. ही माहिती देऊन नववूध तिच्या माहेरी शाहपुराला निघाली होती. नवरीच्या या स्टेटमेंटनंतर शाहपूरा पोलिसांनी आदर्श नगर पोलिस ठाण्यात य़ा घटनेची माहिती दिली.

दरम्यान बायकोचे पळ काढण्याचे कारण ऐकूण नवऱ्याला मोठा धक्का बसला. या प्रकरणानंतर आता दोन्ही कुटुंबियांनी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत तरूणीला या लग्नात कायम राहायचे की नाही? यावर आता निर्णय होणार आहे. आता नवरी नवऱ्याला सोडचिठ्ठी देते की लग्नात कायम राहते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : धक्कायदायक घटना! धावत्या बसमध्ये तरूणीसोबत शरीरसंबंध ठेवले नंतर…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT