Jaipur Mumbai train firing:रेल्वे गोळीबार प्रकरणच नाही….,चेतनसिंहवर ‘हे’ गुन्हे दाखल, क्रिमिनल रेकॉर्ड आला समोर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

jaipur train firing case chetansingh choudhary criminal record
jaipur train firing case chetansingh choudhary criminal record
social share
google news

Jaipur Train Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 31 जुलैला जी घटना घडली होती, या घटनेने अजूनही संपूर्ण देश हादरला आहे. कारण ज्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरीवर प्रवाशाच्या सुरक्षेची जबाबदारी दिली होती. त्या क़ॉस्टेबलनेच चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याप्रकरणानंतर त्याला अटक झाली असून, या प्रकरणाचा तपास सूरू आहे. मात्र चेतनसिंह पोलिसांनी सहकार्य करत नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी इतर मार्गाने या घटनेचा तपास सुरु केला आहे. या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. चेतनसिंह संदर्भातले हे खुलासे नेमके काय आहेत? हे जाणून घेऊयात. (jaipur train firing case chetansingh choudhary criminal record)

चेतनसिंह चौधरी पोलीस चौकशीत सहकार्य करत नसल्याने आता तपास अधिकाऱ्यांनी त्याची सेवा पुस्तिका तपासली आहे. या पुस्तिकेतून पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार चेतनसिंहने गोळीबार प्रकरणाआधी तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. हे गुन्हे काय आहेत हे पाहूयात.

पहिला गुन्हा 
चेतनसिंहवर असलेला पहिला गुन्हा असा आहे की, 2017 मध्ये चेतनसिंह उज्जैन येथील आरपीएफच्या श्वान पथकात कार्यरत होता. त्यावेळेस चेतनसिंह वाहिद खान नावाच्या व्यक्तीला चौकीत आणून त्रास दिला होता व त्याला धमकावले होते. या प्रकणानंतर विभागीय चौकशी झाली होती.या चौकशीनंतर चेतनसिंहवर कारवाई करण्यात आली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mumbai crime: सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड

दुसरा गुन्हा
2011 मध्ये चेतनसिंह हरियाणात कार्यरत होता. त्यावेळेस त्याने एका सहकाऱ्याच्या एटीएम कार्डद्वारे 25 हजार काढले होते. या प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली होती.

तिसरा गुन्हा
गुजरातमध्ये कार्यरत असताना चेतन सिंहने महेश चव्हाण नावाच्या सहकर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकणामध्येही त्याच्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे गोळीबार प्रकरणाआधी चेतनसिंहवर असलेले हे आरोप देखील गंभीर स्वरूपाचे आहेत.

ADVERTISEMENT

बुरखाधारी महिलेला‘जय माता दी’म्हणायला लावलं

ज्या ट्रेनमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्याच ट्रेनमधूनच आता पोलिसांच्या हाती एक ठोस पूरावा देखील लागला आहे. ट्रेनमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरीने बंदुकीच्या जोरावर एका बुरखाधारी महिलेला ‘जय माता दी’ म्हणण्यास भाग पाडले होते, असे तपासात समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जीआरपी अधिकाऱ्यांनी महिलेची ओळख पटवली असून तिचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात या महिलेला महत्त्वाची साक्षीदार करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime : बापाच्या प्रेम प्रकरणाची मुलाला शिक्षा, प्रेयसीने गळा आवळून…घटनेने शहर हादरलं

जयपूर ट्रेन गोळीबार प्रकरणात चेतनसिंग चौधरीने आपले वरिष्ठ सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा आणि तीन रेल्वे प्रवाशांची हत्या केली. अब्दुल कादर, सय्यद सैफुद्दीन आणि असगर अब्बास शेख अशी या प्रवाशांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT