New Year च्या पार्टीने केला घात, 6 जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jamshedpur Jharkhand 6 friends die car accident while returning from New Year party
Jamshedpur Jharkhand 6 friends die car accident while returning from New Year party
social share
google news

Accident News: नवं वर्षाचे सगळ्या जगभरात उत्साहात आणि आनंदात स्वागत होत असतानाच झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूरमधून मात्र एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जमशेदपूरमध्ये (Jamashedpur) झालेल्या भीषण अपघातात 6 मित्रांचा मृत्यू झाला असून नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेकांना याचा धक्का बसला आहे. या अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार (Car Accident) आधी रस्त्याच्या दुभाजकाला आदळली. त्यानंतर पुन्हा झाडाला आदळून ती कार रस्त्याकडेला जाऊन उलटली. या दुर्घटनेत कारमधील 6 मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

कानठळ्या बसवणारा आवाज

कार जेव्हा रस्त्याच्या दुभाजकाला आदळली त्यावेळी अपघाताचा तो आवाज इतका भीषण होता की, घटनास्थळावरून दूर असलेल्या लोकांनाही तो आवाज ऐकू गेला होता. त्या आवाजामुळे नंतर अपघातस्थळी प्रचंड गर्दी जमली होती. नववर्षाच्या स्वागतादिवशीच भीषण अपघात झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या अपघातानंतर काही राजकीय नेत्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली.

हे ही वाचा >> Amruta Fadnavis : नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या अन् अमृता फडणवीस झाल्या ट्रोल, ‘त्या’ व्हिडिओत काय?

पार्टी जीवावर बेतली

कारचा अपघात झाल्यानंतर जमलेल्या लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन कारमधील मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी हे मित्र पार्टी करण्यासाठी कुठे गेले होते, त्याचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

मृतदेह कारमध्येच अडकले

या अपघाताबद्दल असंही सांगितलं जात आहे की, नव्या वर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी हे 8 मित्र एका हॉटेलवर गेले होते. त्या हॉटेलवर पार्टी करून ते घरी परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यात प्रचंड गर्दी जमली होती. हा अपघात इतका भयानक होता की, कारचा पूर्ण चक्काचूर झाला होता. 6 जणांचे मृतदेह कारमध्येच अडकले होते, तर 2 दोघं जणं गंभीर जखमी झाले होते. जखमींना क्रेनच्या माध्यमातून कारमधून बाहेर काढण्यात आले. ज्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे, ते सहा जणही आरआयटीच्या कुलुप्तांगामधील राहणारे होते.

दोघांचा जीव वाचला

कार अपघाताली गंभीर जखमी झालेल्या सुनील झाच्या वडिलांनी सांगितले की, कारचा अपघात झाल्यानंतर जागीच सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघा जखमींना बाहेर काढण्यात आले होते. अपघातातील सुनील झाची तब्बेत चांगली असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचेही त्याच्या वडिलांनी सांगितले. अपघातातील मृत झालेले आणि जखमी झालेले युवक हे बाबा आश्रम परिसरातील असून युवकांचे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Latur Crime : मित्राचे आईसोबत प्रेमसंबंध, जनावरांच्या गोठ्यातच…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT