Kalyan Crime : आजीच्या पेन्शनसाठी नातेवाईक भिडले, बँकेत रक्ताचा सडा; कल्याण हादरलं!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

kalyan crime news big fight with two group gran mother pension amount crime story
कल्याणमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमधून हादरवून टाकणारी घटना

point

पेन्शनवरून दोघा भावांवर हल्ला

point

दोन्ही गटामध्ये हा संपूर्ण वाद बँकेतच सूरू होता.

Kalyan News : कल्याणमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत वृद्ध महिलेच्या पेन्शनवरून दोन नातेवाईकांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. पेन्शनसाठी एका नातेवाईकाने दुसऱ्या नातेवाईकावर धारदार चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर हल्लेखोर नातेवाईक फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. (kalyan crime news big fight with two group gran mother pension amount crime story) 

कल्याणमध्ये राहणाऱ्या राहुल परमार आणि विजय परमार यांची आजी रिटायर झाली होती. आज्जी रिटायर झाल्यानंतर त्यांच्या पेन्शनचे पैसै बँकेत जमा झाले होते. ही माहिती परमार बंधुंना मिळताच पैसै काढण्यासाठी दोघेही आज्जींना घेऊन बँकेत पोहोचले होते. त्याचवेळी बँकेत प्रथमेश चव्हाण, नाथा चव्हाण आणि मयुर चव्हाण देखील उपस्थित होते. यावेळी चव्हाणांनी ही आम्ही देखील आजीच्या पेन्शनच्या पैशाचे हकदार आहोत. आम्हाला ही पेन्शचे पैसे हवेत. यावरून परमार बंधू आणि चव्हाणांमध्ये जोरदार शाब्दीक वाद झाला.  

हे ही वाचा : Waqf Board: 'बक्कल तुटले, पळा पळा...', श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर का केली तुफान टीका?

दोन्ही गटामध्ये हा संपूर्ण वाद बँकेतच सूरू होता. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी दोघांना समजावून सांगत, बँकेतून बाहेर केले. मात्र तरी देखील दोघांमधील वाद शमला नाही आणि उलट वाढतच गेला. त्यानंतर चव्हाण गटाने चाकू काढून परमार बंधूंवर सपासप वार करून हल्ला केला. या हल्ल्यात परमार बंधू गंभीररीत्या जखमी झाले होते. या संपूर्ण घटनेनंतर चव्हाण गटाने पळ काढला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेची माहिती मिळताच बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी पोलिसांनी राड्याचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच आरोपी चव्हाण गटाचा पोलीस तपास करत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन टीम गठीत करण्यात आली आहे. ही टीम लवकरच आरोपीला गजाआड करेल असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर कल्याणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हे ही वाचा : Udhhav Thackeray : ठाकरेंना मोठा झटका? दिल्ली दौऱ्याची Inside Story

    follow whatsapp

    ADVERTISEMENT