Kalyan Crime: किरकोळ वाद, मित्रानेच चार्जरच्या वायरने गळा आवळून केला खेळ खल्लास!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Kalyan Kolsewadi Crime Case : अनेकदा दारुच्या नशेत मित्रांमध्ये झालेला वाद, भांडण याबद्दल आपण ऐकलं असेल.
Kalyan Kolsewadi Crime Case : अनेकदा दारुच्या नशेत मित्रांमध्ये झालेला वाद, भांडण याबद्दल आपण ऐकलं असेल.
social share
google news

Kalyan Kolsewadi Crime Case : अनेकदा दारुच्या नशेत मित्रांमध्ये झालेला वाद, भांडण याबद्दल आपण ऐकलं असेल. पण हेच भांडण जेव्हा टोकाचं वळण घेतं तेव्हा ते भयानक रूप घेतं. अशीच काहीशी घटना कल्याणमध्ये कोळसेवाडी परिसरात घडलं आहे. पार्टीला बसले असतानाच दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला पण, हा वाद एकाचा जीवावर बेतला आहे. (Kalyan Kolsewadi Crime Case Accused Killed his friend with mobile charger wire)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

कल्याण कोळशेवाडी खडेगोलवली परिसरात (Kolsewadi Police Station) अनिलकुमार यादव व हिरालाल निशाद हे दोघे मित्र भाड्याच्या रूममध्ये राहत असून एका चपलीच्या कारखान्यात काम करत होते. हे दोघे मित्र एका ठिकाणी पार्टी करण्यास बसले व या दरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला यावेळी हिरालालने ‘तुझे रात में बताता हूं’ अशी धमकी दिली. यानंतर हिरालाल अनिलकुमारच्या झोपण्याची वाट पाहत होता. तो झोपल्यानंतर हिरालालने त्याची गळा आवळून हत्या केली.

हे ही वाचा >> देशातील 5 राज्यात सत्तेचा कौल कोणाला? ओपिनियन पोल नेमकं काय सांगतो?

पहाटे जेव्हा अनिल कुमारचे इतर मित्र त्याला उठवत होते तेव्हा तो जागेवरून उठला नाही हे पाहताच त्याच्या मित्रांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कोळसेवाडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता अनिल कुमार याची गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> सेल्फीनं घेतला जीव! महाबळेश्वरमध्ये दरीत कोसळून पुण्याची महिला ठार

माहितीनुसार, पोलिसांनी चौकशी करत आरोपी हिरालालला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्याने अनिल कुमारचा खून केल्याची कबुली दिली. हिरालालने अनिल झोपेत असताना चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. सध्या पोलिसांनी हिरालालला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT