Kalyan Crime : मित्रांनीच केला घात, फुस लावून रूमवर नेलं आणि…अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खरं तर या अल्पवयीन मुलीची तिच्याच मित्रांनी छेड काढली होती. ज्यामुळे ती मानसिक तणावात गेली होती.या मानसिक तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (kalyan minor girl suicide her friend tease her shocking crime story)

ADVERTISEMENT

कल्याण पश्चिमेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहत होती. शुक्रवारी घरी असताना ती कुणाशीच बोलत नव्हती. तिच्यावर मानसिक तणाव असल्याचे दिसत होते. त्यावेळेस तिच्या भावाने तिची विचारपूस केली असता मुलीने घडलेला सर्व धक्कादायक प्रसंग सांगितला.माझ्यासोबत माझ्या मित्रांनी गैरकृत्य करीत छेडछाड केली आहे. हे ऐकताच भवालाही धक्का बसला आणि तो घराबाहेर गेला आणि काही वेळाने परतला. तिथपर्यंत बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे पाहून त्याला जबर मानसिक धक्का बसला.

हे ही वाचा : Thane Lift Collapse : धक्कादायक! ठाण्यात लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू

या घटनेची माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार आणि महिला पोलिस अधिकारी दीपाली वाघ यांनी  मुलीचा मृतदेह रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठवला.यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणी, तिचे मित्र त्यांची चौकशी सुरु केली. या चौकशीतून जे समोर आले आहे ते अतिशय धक्कादायक होते. या मुलीला चार दिवसापूर्वी तिच्या दोन मित्रांनी तिला सांगितले की, आपण मॉल ला जाऊ. तिला बोलवून घेतले. मॉलच्या बाजूला यापैकी एका मित्राचे घर आहे. त्याठीकाणी सर्व जण जमले. त्याठिकाणी या मुलीचे मित्र आणि त्या मित्रांचे दोन मित्र असे चार जण होते. या चौघांनी मुलीसोबत छेडछाड करत तिला धमकावलं. घरी सांगू नको, नाही तर आम्ही काय करायचे ते बघू असी धमकी दिली.

हे वाचलं का?

य़ा घटनेनंतर मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. या तणावातून तिने आत्महत्या केली. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहोत. मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या विरोधात भादवि ३०६ , ३५४, ३४ पोक्सा ८,१२ प्रमाणे चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुलीचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठविला आहे. मुलीसोबत छेडछाड झाली आहे की, तिच्यासोबत आणखी काही गैर प्रकार घडला आहे. हे तिच्या शवविच्छेदन अहवाला पश्चात कळणार आहे. अहवालात काही आढळून आल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांनी पुन्हा काढला निवृत्तीचा मुद्दा, शरद पवारांना आव्हान देत म्हणाले…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT