'गच्चीवर ड्रोन पडलाय..' 19 वर्षीय तरुण घरात शिरला अन् वृद्ध महिलेसोबत.. नेमकं काय घडलं?
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने या हत्याकांडाचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचला होता. त्याने सलग तीन दिवस या घराची रेकी केली होती आणि महिला घरात कधी एकटी असते, याची संपूर्ण माहिती मिळवली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'गच्चीवर ड्रोन पडलाय..'
19 वर्षीय तरुण घरात शिरला अन् वृद्ध महिलेसोबत..
नेमकं काय घडलं?
Crime News : एका वृद्ध महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, ज्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी वेगानं तपास चक्रं फिरवली आणि अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या. या धक्कादायक हत्याकांडात 19 वर्षीय आर्यन शर्मा उर्फ ईशू याला अटक करण्यात आली असून, त्याने वृद्धेची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील हे प्रकरण आहे.
नियोजनबद्ध कट रचला
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने या हत्याकांडाचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचला होता. त्याने सलग तीन दिवस या घराची रेकी केली होती आणि महिला घरात कधी एकटी असते, याची संपूर्ण माहिती मिळवली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने 'गच्चीवर ड्रोन पडला आहे' असे खोटे सांगून घरात प्रवेश मिळवला. घरात शिरल्यानंतर महिला एकटी असल्याचे पाहून त्याने कापडाने त्यांचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिथून पळ काढला.
हे ही वाचा : काका अशी ओळख सांगून, 6 वर्षीय मुलीला घरात फसवून नेले नंतर नको तेच... लाज आणणारी घटना
27 लाखांचे सोने जप्त
विशेष म्हणजे, आरोपी आर्यन हा याच परिसरात सुमारे आठ वर्षे भाड्याने राहत होता. त्यामुळे त्याला घराची रचना आणि आजूबाजूच्या गल्ल्यांची खडान् खडा माहिती होती, ज्याचा त्याने गुन्हा करण्यासाठी गैरफायदा घेतला. तांत्रिक पुरावे आणि स्थानिक गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. त्याच्या ताब्यातून १५३ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून, त्याचे बाजारमूल्य सुमारे २७ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा : 37 वर्षीय घटस्फोटित पुरुषाला लग्नासाठी व्हर्जिन तरुणी हवी, मध्यस्ती करणाऱ्या महिलेनं सांगितला घटनाक्रम, Video व्हायरल
साथीदार कोण?
सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखी कोणी साथीदार सामील होते का, की त्याने हे कृत्य एकट्यानेच केले, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेच्या खुलाशामुळे परिसरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी, घरफोडी आणि हत्येच्या या भीषण प्रकारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.









