Heinous crime : बलात्कार करून दातांनी तोडले शरीराचे लचके अन् प्रायव्हेट पार्टमध्ये…

मुंबई तक

ADVERTISEMENT

kanpur warden girls hostel raped and killed with severe injuries private parts
kanpur warden girls hostel raped and killed with severe injuries private parts
social share
google news

Kanpur News: कानपूरमधील काकदेव कोचिंग मंडी येथील गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डनच्या (Girls Hostel Warden) मृत्यूनंतर आता शवविच्छेदनच्या अहवालानंतर (post-mortem report) अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या अहवालामध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टला (Private Part) गंभीर दुखापत झाली असून अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ADVERTISEMENT

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार

वॉर्डनच्या मृत्यू प्रकरणानंतर अशीही शंका व्यक्त केली जात आहे की, शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळेच आरोपीने ही क्रूरता केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी मुख्य आरोपी कुलदीप यादव उर्फ ​​अर्जुन याच्याविरुद्ध बलात्कारानंतर हत्येचा गुन्हा नोंद करुन त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. त्याच बरोबर त्याचा भाऊ आणि अन्य दोघा साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Ratnagiri : ऐकावं ते नवलंच! व्हेल माशाच्या पिलाचा मानसिक तणावामुळे मृत्यू

रक्ताच्या थारोळ्यात नग्नावस्थेत मृतदेह

मूळची हरदोई येथील 35 वर्षाची असलेली महिला गेल्या अडीच वर्षांपासून एका वसतिगृहात वॉर्डन म्हणून काम करत होती. हे काम करत असतानाच ती तिसर्‍या मजल्यावर असलेल्या एका टिफिन शॉपवरही काम करत होती. मात्र सोमवारी त्याच महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नग्नावस्थेत पडलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर त्याचा अहवालही पोलिसांनी मागवून घेतला होता.

हे वाचलं का?

प्रायव्हेट पार्टवर हल्ला

शवविच्छेदनाचे अहवाल पाहिल्यानंतर मात्र पोलिसानांही धक्का बसला आहे. कारण त्या अहवालामध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी या घटनेचा खुलासा करत कुलदीप यादव उर्फ ​​अर्जुन याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी अर्जुनचा भाऊ रिंकू, मित्र चिंटू आणि रोहितला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही तुरुंगात पाठवले आहे. महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून प्रायव्हेट पार्टवरला गंभीर दुखापत करण्यात आली आहे. तर डोक्याच्या मागील बाजूलाही मोठी जखमी झाली असून महिलेचं डोकं भिंतीवर आदळून मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> Ratnagiri : दारू प्यायल्यानंतर चॉकलेट खाण्याची सवय बेतली जीवावर, नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT