Crime: शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला, तरूणाने स्क्रू डायव्हरने…लिव्ह इन पार्टनरसोबत भयंकर कृत्य

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

live in partner denied physical relation boy with screwdriver gurugram crime story
live in partner denied physical relation boy with screwdriver gurugram crime story
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इन पार्टनरच्या हत्याकांडाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्य़ा आहेत. श्रद्धा वालकर, मीरा रोडमधील सरस्वती हत्याकांड ही त्याची उदाहरणे आहेत. या घटना ताजा असतानाच आता आणखीण एक घटना समोर आली आहे. या घटनेते शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरूणाने स्क्रु डायव्हरने लिव्ह इन पार्टनरवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरूणी गंभीररीत्या जखमी झाली असून तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तर आरोपी तरूणालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.(live in partner denied physical relation boy with screwdriver gurugram crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी शिवम आणि तरूणीसोबत गेल्या एक वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. दोघेही मुळचे युपीचे रहिवाशी आहेत. शिवमने तरूणीला लग्नाचे आमीष दिले होते, त्यामुळेच गेल्या एक वर्षापासून ते एकत्र राहत होते. दरम्यान लिव्ह इन मध्ये असताना तरूणीला शिवमबाबत एक धक्कादायक माहिती मिळाली होती. शिवमचे आधीच एक लग्न झाले आहे, आणि या लग्नापासून त्याला दोन मुले आहेत. तरूणीला शिवमचे हे सत्य कळताच तिने त्याच्यापासून दुर राहायला सुरुवात केली.याचसोबत शिवमचे घर देखील सोडले होते.

हे ही वाचा : Crime: बंदुकीचा धाक दाखवून वहिनीवर बलात्कार, नंतर अश्लील व्हिडिओ बनवून…, धक्कादायक घटना

तरूणी शिवमपासून दुर झाल्यानंतर तिने नाहरपूर परीसरात भाड्याने घर घेतले, आणि या नवीन ठिकाणी तिने राहण्यास सुरुवात केली. शिवमला तरूणीची ही गोष्ट कळताच त्याला राग अनावर झाला. या रागाच्या भरात शिवमने तरूणीचे घर गाठले आणि तरूणीवर जबरदस्ती शरीरसंबंध बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणीने संबंध ठेवण्यास विरोध केला. तरूणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने शिवमने स्क्रु डायव्हरने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर स्थानिकांनी तिला रूग्णालयात दाखल केले होते. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.

हे वाचलं का?

एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी सांगितले की, आरोपी शिवमला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींविरुद्ध भादंवि कलम 307, 323, 324 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. गुरूग्रामध्ये ही घटना घडली आहे.

हे ही वाचा : Nanded Crime: फळ विक्रेत्याने दोन्ही हात कोयत्याने तोडले, कारण फक्त हसला अन्…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT