भूस्खलनात कुटुंबे उद्ध्वस्त! तीन मुलांसह 5 जणांचा दरडीने घेतला घास

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra raigad irshalwadi landslide jammu kashmir landslide 8 person dead
maharashtra raigad irshalwadi landslide jammu kashmir landslide 8 person dead
social share
google news

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर (irshalwadi landslide) बुधवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 48 घरांची वाडी जमीनदोस्त झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेने इर्शाळवाडीवर शोककळा पसरली आहे. ही घटना ताजी असतानाच आता जम्मू काश्मिरमधून देखील दरड कोसळल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. या घटनेत तीन चिमुकल्यांसह 8 जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (maharashtra raigad irshalwadi landslide jammu kashmir landslide 8 person dead)

ADVERTISEMENT

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सूरू आहे. या मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मिरमधील कठुआ जिल्ह्यात दरड कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबल्याची माहिती आहे. या ढिगाऱ्याखाली दबून तीन चिमुकल्यांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रशासनाकडून मदत जाहीर

दरम्यान या घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर बनी तहसीलमधील घराच्या ढिगाऱ्याखाली तीन लोक अडकल्याची माहिती कठुआचे उपायुक्त राकेश मिन्हास यांनी दिली आहे. या भीषण दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या कुटुबियांना 50 हजार तर जखमींना 25 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. यासोबत सरकारी मदत तत्काळ पुरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!

एकाच कुटुंबातील तिघे बेपत्ता

सुरजन भागातील दोन घरांवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. यामध्ये 14 वर्षीय शाहबाज अहमद आणि 10 वर्षीय नजीर तबस्सुम यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र घरातील आणखी तीन जणांचा ठावठिकाणा अद्याप लागला नाही आहे. त्यामुळे घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

सुरजन भागासह सिट्टी गावात आपल्या घराच्या बाहेर उभा असलेला 13 वर्षाचा मुलगा दरडीखाली आला आहे. यासह द्रंगल मंडोटजवळ देखील 55 वर्षाची महिला दरडीखाली जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान जम्मू काश्मिरमध्ये अशा दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेतील नागरीकांचा बचाव करण्यासाठी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.तसेच युद्ध पातळीवर सध्या बचावकार्य सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Irshalwadi Landslide : “आम्ही हाताने माती उकरून लेकरं बाहेर काढली”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT