Kalyan Marathi Family: 'मराठी लोक भिकारडे...', परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला हिणवत तुफान मारहाण
Kalyan Viral Video: कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यानंतर आता या प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
किरकोळ कारणावरून हायप्रोफाईल सोसायटीमध्ये वाद
लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी तीन जण जखमी एकाची प्रकृती चिंताजनक
अखिलेश शुक्ला याच्याकडून मराठी कुटुंबाला भीषण मारहाण
कल्याण: मंत्रालयात काम करतो.. गाडीला अंबर दिवा लावून फिरतो. सोसायटीत इतकी दहशत की, कोणीही त्याच्या विरोधात बोलत नाही. अशी दहशत कल्याणच्या अजमेरा हाईटसमध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला याची आहे. धूप लावण्याच्या वादातून अखिलेश शुक्ला याने दहा ते पंधरा जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादाय घटना कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाइल सोसायटीत घडली आहे. मात्र, या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. तसंच आता या प्रकरणात मनसेनेही एंन्ट्री केली आहे.
दोन दिवसात अखिलेश शुक्लाला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरु. शुक्ला जिथे कुठे असेल त्याला मनसे स्टाईलने पोलिसात हजर करु. असा इशारा मनसेने यावेळी दिला आहे. दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारतीतच अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होता होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
हे ही वाचा>> शरद पवार आणि PM मोदींच्या भेटीनंतर होणार सगळ्यात मोठा राजकीय धमाका? | Opinion
या वादातून शुक्ला याने बाहेरून दहा ते पंधरा जणाना बोलावून घेतले. 'मराठी लोक भिकारडे...' असं हिणवत शुक्लाने त्याच्या शेजाऱ्यांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिजीत देशमुखच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विजय कळविकटे, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.










