Crime : ‘या’ अॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास
ही घटना घडली आहे भोपाळमधील रतीबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलबाद भागात. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट आणि सल्फासच्या गोळ्यांचे पाकिटही जप्त केले आहे.
ADVERTISEMENT

Crime News Marathi : आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि नवरा-बायको. आनंदी लहान कुटुंब. पण एका छोट्याशा चुकीचा फटका या कुटुंबाला इतका बसला की त्यांना सामूहिक आत्महत्या करावी लागली. मुलांना विष दिलं आणि पती-पत्नीने गळफास लावून घेतला. हे घडलं एका लोन अॅप्समुळे. एक कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं, याची सगळी कहाणी सुसाईड नोटमुळे समोर आलीये. (A case of mass suicide has come to light in Bhopal, the capital of Madhya Pradesh. Here 4 people of the same family have committed suicide.)
ही घटना घडली आहे मध्य प्रदेशमधील भोपाळजवळ असलेल्या रतीबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलबाद भागात. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट आणि सल्फासच्या गोळ्यांचे पाकिटही जप्त केले आहे. एसीपी चंद्र प्रकाश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी 8 आणि 3 वर्षाच्या मुलांना सल्फासच्या गोळ्या दिल्या आणि नंतर पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आर्थिक अडचणी सापडल्याने कुटुंबाला जगवण्यासाठी लोन अॅप्स कर्ज घेतलं, पण शेवटपर्यंत बाहेर पडताच आले नाही आणि कुटुंब संपलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हा एका खाजगी विमा कंपनीत कामाला होता, मात्र काही तोट्यामुळे त्याने कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याला वेळेवर फेडता आले नाही, त्यामुळे त्याच्यावर कर्ज वाढतच गेले आणि त्याने हे जीवघेणे पाऊल उचलले. ही घटना नेमकी का आणि कशी घडली, हे सुसाईड नोटमुळे समोर आले आहे.
चार पानांची सुसाईड नोट, कुटुंबाची प्रचंड वेदनादायी कहाणी
सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, ‘काय करावं समजत नाहीये. आमच्या इतक्या गोड कुटुंबाला कुणाची नजर लागली माहीत नाही. हात जोडून कुटुंबीयांची माफी मागायची आहे. एका चुकीमुळे आमच्या जवळच्या सर्व लोकांना खूप त्रास झाला.’