Santosh Bangar : आमदार बांगर आले जोशात अन्.. थेट पोलिसातच गुन्हा दाखल !
Santosh Bangar : वादात आणि चर्चेत असलेले आमदार संतोष बांगर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भर कावड यात्रेत नंगी तलवार नाचवल्याने आता थेट पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
Santosh Bangar on sword case : महाराष्ट्रात मुंबई-सुरत-गुवाहटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करुन ठाकरे सरकारला शिंदे गटाने पायउतार केले होते. त्यावेळी बंडखोर शिंदे गटाला थांबवण्यासाठी अश्रू ढासळत निष्ठेचा नांगर संतोष बांगर (Santosh Bangar) म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून जाऊ नका असं जाहीर आवाहन केले होते. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ‘निष्ठेचा नांगर, संतोष बांगर’ हे वाक्य प्रसिद्धीच्या झोतात आले आणि त्याच बरोबर आमदार संतोष बांगरही प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर वारंवार कधी अपशब्द वापरणे, कधी सरकारी अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा करणे अशा प्रकरामुळेही संतोष बांगर चर्चेत राहिले. (santosh bangar sword in Kavad Yatra, crime in Kalmanuri Police)
ADVERTISEMENT
चर्चेत असलेलं नाव
आमदार संतोष बांगर सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आताही ते पुन्हा एकदा वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा तो तलवार नाचवल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे संतोष बांगर यांच्यावर आता पोलीस काय निर्णय घेतात. त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा >> Student Suicide : CID मध्ये झालेली निवड, पण.. 22 वर्षीय तरुणीने का संपवलं आयुष्य?
कावड यात्रा काढून शक्तीप्रदर्शन
हिंगोलीतील उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढून मोठे शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमदार असलेल्या संतोष बांगर यांनी नंगी तलवार फिरून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर आता प्रचंड टीका केली जात आहे.
हे वाचलं का?
गुन्हा नोंदवला
कावड यात्रेत नंगी तलवार फिरवल्या प्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शक्तीप्रदर्शन दाखवणं हे आता आमदार संतोष बांगर यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे.
हे ही वाचा >> Ranjit Naik-Nimbalkar: वहिनी-दादाची आत्महत्या, भावाने बोट छाटलं.. BJP खासदाराला अटक होणार?
बेकायदेशीर डीजे
कावड यात्रे दरम्यान बेकायदेशीर डीजे वाजवणे तसेच तलवार थिरकवण्या वरून आमदार संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी येथे हत्यार बंदी कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल कावड यात्रेदरम्यान एका कार्यकर्त्यांने आमदार संतोष बांगर यांना तलवार भेट दिली होती.
ADVERTISEMENT
तलवार काढून थिरकावली
त्या नंतर संतोष बांगर यांनी अतिउत्साहाच्या भरात खुलेआम तलवार काढून थिरकावली होती. या नंतर संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT