Mumbai Crime : एअर होस्टेस हत्या प्रकरण, आरोपीची लॉकअपमध्येच पँटने गळफास घेऊन आत्महत्या
ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओग्रेची हत्या करणाऱ्या आरोपीचा मुंबईतील अंधेरी पोलीस लॉकअपमध्ये मृतदेह आढळला. शुक्रवारी (8 सप्टेंबर) पहाटे आरोपी अंधेरी पोलीस स्टेशनच्या टॉयलेटमध्ये स्वत:च्याच पँटने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला.
ADVERTISEMENT
Mumbai Air Hostess Murder Case : ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओग्रेची हत्या करणाऱ्या आरोपीचा मुंबईतील अंधेरी पोलीस लॉकअपमध्ये मृतदेह आढळला. शुक्रवारी (8 सप्टेंबर) पहाटे आरोपी अंधेरी पोलीस स्टेशनच्या टॉयलेटमध्ये स्वत:च्याच पँटने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला. पोलीस कोठडीत आरोपीच्या आत्महत्येच्या या संशयास्पद प्रकरणाने सध्या खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime In the air hostess murder case the accused committed suicide by hanging himself with his pants in the lockup)
ADVERTISEMENT
रविवारी (10 सप्टेंबर) रात्री उशिरा अंधेरीच्या मरोळ भागात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय रुपल ओग्रे हिचा गळा चिरून हत्या करण्यात आली. ती मूळची रायपूर, छत्तीसगडची रहिवासी होती. यावर्षी एप्रिल महिन्यात ती एका खासगी विमान कंपनीत ट्रेनिंग घेण्यासाठी मुंबईला आली होती.
Maratha Morcha : ‘तुम्ही जर असं केलं तर आरक्षण द्यायचं कुणाला?’ जरांगे पाटलांचा भावूक सवाल
पीडित तरुणी राहत असलेल्या रहिवासी सोसायटीत गेल्या एक वर्षापासून सफाई काम करणाऱ्या विक्रम अटवाल (40) याला तिच्या हत्येच्या आरोपाखाली सोमवारी (4 सप्टेंबर) अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने आरोपीला 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
हे वाचलं का?
तपासादरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेले कपडे तसेच आरोपीने रूपल ओग्रेची हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे.
संपूर्ण प्रकण कसं आलं उघडकीस?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रूपल तिची बहीण आणि बहिणीचा बॉयफ्रेंड यांसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. दोघेही बाहेर गेले होते आणि फ्लॅटवर रुपल एकटीच होती. हत्येपुर्वी तिने आरोपी विक्रम अटवालला बाथरूमचा चॉरअप झालेला पाईप साफ करण्यासाठी बोलावलं होतं. यावेळी रूपल घरी एकटी असल्याचं पाहून विक्रमने संधी साधत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.
ADVERTISEMENT
यावर रूपल ओग्रेने त्याला नकार दिला. त्यामुळे रूपल आणि विक्रममध्ये कडाक्याचं भांडण होऊन वाद झाला. या वादातूनच विक्रमने चाकूने गळा चिरून तिची हत्या केली. हत्येपुर्वीच तिचे कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. त्यानंतर तिला पुन्हा एकदा फोन केल्यानंतर तिने उचलला नसल्याने कुटुंबाला चिंता वाटत होती. त्यामुळे रूपलच्या मित्रांद्वारे चौकशी केली आणि त्यांना फ्लॅटवर जाण्यास सांगितलं. मित्र तिथे पोहोचताच फ्लॅट आतून बंद दिसला.
ADVERTISEMENT
Chhatrapati Shivaji maharaj : अफजल खान वधातील महाराजांची ‘ती’ वाघनखं आता मायभूमीत
यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधला, त्यांच्या मदतीने दुसरी चावी वापरून फ्लॅट उघडण्यात आला. यावेळी रुपल रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होती. अशाप्रकारे ही घटना उघडकीस आली. काही तासांतच टेक-इंटेल आणि इतर पद्धतींचा वापर करून पोलिसांनी आरोपी विक्रम अटवालला अटक केली होती.
पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरोपी विक्रम अटवाल हा विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.
India, भारत, हिंदुस्तान… कुठून आली ही नावं? समजून घ्या संपूर्ण इतिहास
रूपल ओग्रेबद्दल वैयक्तिक माहिती
छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या न्यू राजेंद्रनगर भागातील रहिवासी चंद्रिका ओग्रे या सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांना 3 मुली आणि एक मुलगा आहे. सर्वात लहान मुलगी रूपल ओग्रे ही एअर होस्टेसचे ट्रेनिंग घेण्यासाठी मुंबईला गेली होती.
रुपलने रायपूरमधूनच शिक्षण पूर्ण केले होते. रायपूरच्या केपीएस स्कूलमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षण चंदीगड येथून झाले. रुपल अतिशय शांत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. ती तिच्या मैत्रिणींसोबत फिरायची आणि तिच्या कुटुंबाची लाडकीही होती. रुपल सहा महिन्यांपूर्वी एका खासगी विमान कंपनीत इन-फ्लाइट क्रू ट्रेनिंग कोर्ससाठी मुंबईत आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT