Mumbai Crime : नवरा-बायकोला नशेची लागली लत; पोटच्या 2 लेकरांना विकले 75 हजारांत

ADVERTISEMENT

mumbai crime news a couple sale her two children due to drugs addiction crime story
mumbai crime news a couple sale her two children due to drugs addiction crime story
social share
google news

Mumbai Crime News : मुंबईतून (Mumbai crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आई-वडिलांनी (Husband wife) आपल्या पोटच्या पोरांची 74 हजारांना विक्री केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा उलगडा होताच मुंबईत एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी (police) आई-वडिलांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आई-वडिलांनी मुलांची विक्री का केली? मुंबईत मुलांची विक्री करणारी टोळी तर सक्रिय नाही ना ? याचा तपास सुरू केला आहे. (mumbai crime news a couple sale her two children due to drugs addiction crime story)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुंबईच्या वांद्रे परिसरात शब्बीर खान आणि सानिया खान हे आरोपी दाम्पत्य राहते. हे दाम्पत्य शब्बीर खानची बहिण रुबिना खानच्या घरी राहायचे. यावेळी शब्बीर खान आणि सानिया खान हे जोडपे ड्रग्जच्या प्रचंड आहारी गेले होते. या ड्रग्जच्या व्यसनामुळेच दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. या भांडणाला कंटाळून सानिया खान वर्सोव्यात तिच्या माहेरी निघून गेली होती.

हे ही वाचा : Vijay Wadettiwar: “महायुती सरकारमध्ये काय चाललंय?” केसरकरांच्या पत्रानंतर शिंदेंना सवाल

यानंतर शब्बीर खान आणि सानिया खान पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी नालासोपाऱ्यात घर भाड्याने घेऊन राहण्यास सुरूवात केली. या दरम्यान त्यांना 2019 मध्ये सुभान नावाचा मुलगा झाला. या मुलानंतर 2021 मध्ये त्यांना हुसेन नावाचा आणखीन एक मुलगा झाला आणि आता महिन्याभरापूर्वी 1 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांना एक मुलगी झाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या दरम्यान पैशाची अडचण भासू लागल्याने दोघांनीही त्यांच्या मुलांना विकण्याचा निर्णय घेतला. त्त्यानुसार त्यांनी सानियाची मोठ्या बहिणीची जाव उषा राठोड हिच्या मदतीने अंधेरी परिसरात अज्ञात व्यक्तीला 60 हजार रूपयांना हुसेनला विकले. त्यानंतर नवजात मुलीला डी.एन.नगरमध्ये डोंगर परिसरात राहणाऱ्या शकील मकराणी याला 14 हजार रूपयांना विकले होते.ड्रग्जच्या व्यसनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे धक्कादायक कृत्य केले होते.

हे ही वाचा : Shiv Sena : “किती तो निर्लज्जपणा?”, ठाकरे गट संतापला, शिंदेंना दिला इशारा

पैशाअभावी दोघेही पुन्हा बहिण रुबिना खानच्या घरी राहण्यास आले होते. यावेळी शब्बीर आणि सानियासोबत सुभान हा त्यांचा मोठा मुलगा होता तर बाकी इतर दोन्ही मुले नव्हती. त्यामुळे रुबिनाला त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे तिने अन्य मुले कुठे आहेत, अशी विचारणा केली असता दोघांनी यावर उत्तर देणे टाळले. अखेर रुबिनाने सानियाला विश्वासात घेत याबाबतची विचारणा केली असता तिने या घटनेची माहिती दिली.

ADVERTISEMENT

रूबिनाने हा संपूर्ण घटनाक्रम ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर रुबिनाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात आता पोलिसामनी शब्बीर खान आणि सानिया खानला अटक केली आहे. तसेच गुन्हे शाखेने नवजात मुलीला ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात आता तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT