Cyber Crime : मुंबईत ‘डिजिटल दरोडेखोर गँग’; बोगस कागदपत्रं, 200 क्रेडिट कार्ड अन्…
मुंबईतील काही भागातील नागरिकांची कागदपत्रं घेऊन त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड बनवून त्याआधारे लाखो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 200 क्रेडिट कार्ड ताब्यात घेण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT

Digital Fraud : सध्याचं जग डिजिटल युग असल्याचे बोलले जाते. त्याच डिजिटल तंत्रज्ञानाचा (Digital Technology) वापर करुन अनेक घोटाळे झाल्याचेही उघडकीस आले आहे. डिजिटल विश्वात तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेकांना गंडा घालणाऱ्या 12 जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी (Mumbai police) अटक केली आहे. ही टोळी बनावट कागदपत्रांच्या (Duplicate Documents) मदतीने बँक आणि वित्तीय संस्थांची मोठी फसवणूक करत होती. ही टोळी बँकेकडून क्रेडिट कार्ड (Credit card) घेऊन त्यावर गृहकर्जही (home loan) घेत होती. या प्रकारचे अनेक घोटाळे त्यांनी केले असून त्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे.
क्रेडिट कार्डचा घोटाळा
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना सांगितले की, ही टोळी लोकांशी संपर्क साधत होती. त्यांच्याकडून त्याची कागदपत्रे घेऊन वेगवेगळ्या बँकेतून त्यांनी 200 पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड जमा केली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच क्राईम ब्रँचच्या युनिट 3 कडून मुंबईतील भांडूप, मुलुंड, कुर्ला आणि वडाळा परिसरात धाडी टाकून या टोळीला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा >> Newsclick Raid : पत्रकारांच्या घरावर धाडी, मोबाईल-लॅपटॉप जप्त, प्रकरण काय?
सगळं काही बनावट
पोलिसांनी त्यांच्यावर धाड टाकताच त्यांच्याकडून बनावट आयटी रिटर्न, टीडीएस फॉर्म, वीजबिल, विविध कंपन्यांचे शिक्के, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) स्टॅम्प, 10 स्वाइप मशीन, 56 सिम, पॅनकार्ड, आधारकार्ड, 14 मोबाईल फोन आणि 60 हजार रुपयांची रोकडही ताब्यात घेतली आहे.
निव्वळ अश्वासनं
या प्रकरणातील फसवणूक झालेल्यांनी सांगितले की, टोळीच्या सदस्यांनी तिची फसवणूक करुन त्यांना गृहकर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्याचे अश्वासन देण्यात आले होते. त्यांची बनावट कागदपत्रं बनवून त्यांना क्रेडिट कार्ड आणि होम लोन देण्यासाठी त्यांच्याकडून 4.50 लाख रुपये घेतले होते, मात्र त्यांना देण्यात आलेले कोणतेही अश्वासन पूर्ण करण्यात आले नाही.