Nagpur : पुण्यानंतर नागपूर 'ड्रक अ‍ॅंड ड्राईव्ह'ने हादरले! मद्यधुंद तरूणाने तिघांना उडवलं

योगेश पांडे

ADVERTISEMENT

nagpur accident hit and run drunk driver hits  three  person in mahal area nagpur shocking story
नागपूरमध्ये एका तरूणाने मद्यधुंद अवस्थेत 3 जणांना कारने उडवल्याची घटना घडली आहे.
social share
google news

Nagpur Accident News : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची (Pune Porsch Car Accident) घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्ये एका तरूणाने मद्यधुंद अवस्थेत 3 जणांना कारने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला, एक पुरुष आणि 3 महिन्याचं बाळ गंभीर जखमी झाले आहे. नागपूर (Nagpur) शहरातील महाल परिसरातील झेंडा चौकात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने मद्यधुंद चालकाला पकडून बेदम चोप दिला होता. याप्रकरणी आता आरोपी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (nagpur accident hit and run drunk driver hits three  person in mahal area nagpur shocking story) 

ADVERTISEMENT

नागपूर (Nagpur) शहरातील महाल परिसरातील झेंडा चौकात एका कारने रस्त्यावर चालणाऱ्या तीन जणांना उडवल्याची घटना घडली. या अपघातात एक महिला, पुरूष आणि त्यांचं बाळ गंभीर जखमी झालं होतं. या घटनेनंतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 3 महिन्याच्या बाळाची प्रकृती गंभीर आहे. 

हे ही वाचा : भाजप, काँग्रेसला इतक्या जागा मिळणार; योगेंद्र यादवांनी मांडलं सगळं गणित

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक दारू पिऊन गाडी चालवत होता. त्याच्यासोबत कारमध्ये त्याचे दोन मित्र देखील होते. या दोन्ही मित्रांनी देखील दारू प्यायली होते. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत हे तरूण झेंडा चौकातून कार घेऊन जात असतान त्यांनी रस्त्यावरून चालणाऱ्या तीन जणांना धडक दिली होती.

हे वाचलं का?

या घटनेनंतर संतापेलल्या नागरीकांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याला बेदम चोप दिला होता.तसेच चालक तरुणांसोबत असलेल्या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला. 

हे ही वाचा : Pune Accident Update : आरोपीच्या आजोबाला ठोकल्या बेड्या; मोठा कट आला समोर

तपासा दरम्यान पोलिसांना कारमध्ये दारूची बाटली आणि गांजा आढळून आला होता. तसेच पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या दोन साथीदाराचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी तरुणांविरुद्ध हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणांना जामीन मिळू नये यासाठी कडक कलमे लावली आहेत.तसेच अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींवर यापूर्वीच शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती डीसीपी गोरख भामरे यांनी दिली आहे. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT