Nanded : जवानाने गरोदर पत्नीसह 4 वर्षाच्या चिमुकलीचा घेतला जीव! कारण जाणून पोलिसही चक्रावले
महाराष्ट्रात सध्या गुन्ह्यांचं सत्र सुरूच आहे. आता नांदेड जिल्ह्यातून पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका जवानाने आपल्या गरोदर पत्नीसह चार वर्षांच्या मुलीचा गळा दाबून जीव घेतला आहे.
ADVERTISEMENT
Nanded Crime News : महाराष्ट्रात सध्या गुन्ह्यांचं सत्र सुरूच आहे. आता नांदेड जिल्ह्यातून पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका जवानाने आपल्या गरोदर पत्नीसह चार वर्षांच्या मुलीचा गळा दाबून जीव घेतला आहे. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने माळकोली पोलीस ठाणे गाठून स्वत:च गुन्हा केल्याची कबुली दिली. (Nanded Crime News Army Man kills his pregnant wife and 4 year old Daughter)
ADVERTISEMENT
वाचा : Manoj Jarange Patil: ‘…तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन’, उपोषण सोडताच जरांगे-पाटलांचं तुफान भाषण
आरोपीने घडलेला प्रकार सहाय्यक पोलिसाना सांगितला. एपीआई निलपत्रेवार यांनी लगेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत त्याला ताब्यात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. नंतर जे दिसलं ते पाहून पोलिसही चक्रावले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर आरोपी पोलीस ठाण्यात स्वत:च झाला हजर!
ही घटना नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील बोरी गावात घडली. येथे राहणारा आरोपी एकनाथ मारुती जायभाये (32) हा राजस्थानमधील बिकानेर येथे सैन्यात कार्यरत आहे. तो रजेवर आपल्या गावी आला होता आणि आपल्या कुटुंबासह चांगला राहत होता. आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन तो इकडे तिकडे हिंडत होता आणि बायकोशीही त्याची वागणूक चांगली होती. बुधवारी (13 सप्टेंबर) सकाळी 6 वाजता त्याने 8 महिन्यांची गरोदर पत्नी भाग्यश्री (25) आणि मुलगी सरस्वती (4) यांची गळा आवळून हत्या केली.
हे वाचलं का?
वाचा : Nipah virus : ‘निपाह’ने घेतला दोघांचा जीव, संसर्ग होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायची?
मुलीच्या हत्येनंतर आई-वडिलांचे जावयावर गंभीर आरोप!
हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत: माळकोली पोलीस ठाणे गाठून पत्नी व मुलीच्या हत्येची माहिती दिली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत्यू झालेल्या महिलेच्या आई-वडिलांनी आरोप केले आहेत की, ‘आरोपी एकनाथ आपल्या मुलीला पहिली मुलगी का झाली आणि आई-वडिलांच्या घरून प्लॉटसाठी पैसे का आणले नाहीत, यावरून वारंवार त्रास देत होता.’ या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT