नाशिक हादरलं… कंपनीच्या CEO ची भररस्त्यात गाडी अडवून निर्घृण हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये कंपनीच्या CEO ची भररस्त्यात हत्या
नाशिकमध्ये कंपनीच्या CEO ची भररस्त्यात हत्या
social share
google news

Nashik Crime: नाशिक: नाशिकमध्ये (Nashik) दिवसेंदिवस गुन्हेगारीचं (Crime) प्रमाण वाढत चाललं असून अवघ्या 15 दिवसांच्या आत भररस्त्यात एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी एका मिरची व्यापाऱ्याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. तर आता एका कंपनीत CEO पदावर असलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ज्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, कंपनीच्या CEO वर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी त्याची चारचाकी कारही पळवून नेल्याची माहिती मिळत आहे. (nashik crime brutal murder of ceo of the company by stabbing him with a sharp weapon)

नेमकी घटना काय?

नाशिकमधील पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगणजवळ काल (24 मार्च) एका कंपनीत CEO असलेल्या योगेश मोगरे यांची अचानक चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी सपासप वार केले. ज्यामध्ये योगेश मोगरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांनतर त्यांना एका रिक्षा चालकाने उचलून रुग्णालयात नेत दाखल केलं. मात्र, वार वर्मी बसल्यामुळे या हल्ल्यात मॅनेजर योगेश मोगरे यांचा मृत्यू झाला आहे.

योगेश मोगरे हे आपले काम उरकल्यानंतर गरवारे येथील सर्व्हिस रोडवरून पाथर्डी फाट्याकडे MH-15 HY-4959 क्रमांकाच्या चारचाकी कारने घरी जात होते. यावेळी हॉटेल आंगणसमोर दोन अज्ञात गुंडांनी त्यांची गाडी अडवून त्यांना थांबवलं आणि अचानक त्यांच्यावर धारदार कोयता आणि इतर हत्याऱ्यांनी अंगावर, पाठीवर तसेच मानेवर सपासप वार केले. जखमी अवस्थेतील योगेश यांना रस्त्यावर टाकून मारेकऱ्यांनी त्यांची कार घेऊन पोबरा केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अधिक वाचा- कामावर पोहोचण्यास उशीर…, ट्रॅफिक पोलिसाची होमगार्डलाच कानशिलात

या हल्ल्यात योगेश मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडले होते. दरम्यान, याच रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा चालकाने त्यांना त्या अवस्थेत पाहिलं आणि त्याने तात्काळ आपल्या रिक्षात घालून पाथर्डी फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पहाणी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेबाबत रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

ADVERTISEMENT

अधिक वाचा- आईचा राग मनात धरला अन् 14 वर्षांच्या मुलाने मृत्यूला कवटाळलं…

हत्येमागचं कारण अस्पष्ट

एका कंपनीच्या CEO पदावर असलेल्या योगेश मोगरे यांची हत्या का आणि कोणी केली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच या हत्येमागचा उद्देश काय होता याचाही उलगडा झालेला नाही. त्यामुळे आता हल्लेखोरांना शोधण्यासोबतच या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय हे देखील शोधण्याचं मोठं आव्हान आता नाशिक पोलिसांसमोर आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT