Firing on Baba Siddique : सलमान खानचे खास असल्याची किंमत बाबा सिद्दीकींना चुकवावी लागली?
Baba Siddique Death News : बाबा सिद्दीकी यांची हत्या कोणी केली यावर सस्पेन्स कायम आहे. मुंबई पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. या हत्येचे गूढ उकलण्यात पोलीस व्यस्त आहेत. पण संशयाची सुई सलमान खानच्या कट्टर शत्रूकडे वळत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बाबा सिद्दीक यांची गोळ्या झाडून हत्या
पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने करत आहेत तपास
जो 'भाईजान'चा मित्र तो बिश्नोई गँगचा शत्रू?
Baba Siddique Death News : बाबा सिद्दीक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दसऱ्यानिमित्त सगळीकडे जल्लोष होता, दुर्गामातेला निरोप देताना फटाके फोडले जात होते. या सर्वात अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज झाला आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ही घटना वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर परिसरात घडली. बाबा सिद्दीकींना तत्काळ लिलावती रूग्णालयात नेण्यात आले पण, तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. छातीत गोळ्या लागल्याने बाबा सिद्दीकींचा मृत्यू झाला. माहितीनुसार, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी फरार आहे. पण, यामागचा मुख्य सूत्रधार कोण? हा गंभीर प्रश्न आहे. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
ADVERTISEMENT
बाबा सिद्दीकी यांची हत्या कोणी केली यावर सस्पेन्स कायम आहे. मुंबई पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. या हत्येचे गूढ उकलण्यात पोलीस व्यस्त आहेत. पण संशयाची सुई सलमान खानच्या कट्टर शत्रूकडे वळत आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयाची सुई साबरमती कारागृहात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Baba Siddique: राजकीय प्रवास ते बॉलिवूड कनेक्शन! बाबा सिद्दीकींबद्दल माहित नसलेल्या 'त्या' गोष्टी...
पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यातील मैत्रीचे नाते सर्वांनाच माहीत आहे. तर, लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांच्यातील वाद कोणापासूनही लपलेला नाही. याचीच किंमत बाबा सिद्दीकींना चुकवावी लागली का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या तीन आरोपींचा संबंध लॉरेन्स बिश्नोईशी असल्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
बाबा सिद्दीकी यांना दोन गोळ्या लागल्या. दोन्ही गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणात आणखी एक जण जखमी झाला असून, त्याच्या पायाला गोळी लागली आहे. बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते होते. ते महाराष्ट्राचे माजी मंत्रीही होते.
हेही वाचा : Baba Siddique : 'बाबा सिद्दीकी' यांची हत्या करणारे ते तीन शूटर्स कोण? Photo आला समोर
जो 'भाईजान'चा मित्र तो बिश्नोई गँगचा शत्रू?
बिश्नोई गँग केवळ सलमान खानच नाही तर सलमानच्या जवळच्या लोकांनाही आपले शत्रू मानते. पंजाबी गायक एपी ढिल्लोन सलमान खानसोबत एका अल्बममध्ये दिसला होता, त्यानंतर बिश्नोई गँगने कॅनडात एपी ढिल्लोनच्या घरावर गोळीबार केला होता, या गोळीबारानंतर बिश्नोई गँगने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि दावा केला होता की, 'सलमान खानपासून लांब राहायचं.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT