सातशे शूटरचं नेटवर्क, सलमानशी वैर! सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेणारी कशी आहे बिश्नोई गँग?
Baba Siddique Death News : बाबा सिद्दीकी झिशान यांच्या घरातून बाहेर आले, आपल्या गाडीत बसून काही अंतर जाताच तिघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी छातीत आणि दोन गोळ्या पोटात लागल्याने सिद्दीकी गंभीर जखमी झाले.
ADVERTISEMENT

Baba Siddique Death News : बाबा सिद्दीकी झिशान यांच्या घरातून बाहेर आले, आपल्या गाडीत बसून काही अंतर जाताच तिघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी छातीत आणि दोन गोळ्या पोटात लागल्याने सिद्दीकी गंभीर जखमी झाले. कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे मुंबईत दोन दसरा मेळावे सुरु असताना तिकडे वांद्र्यात भर गर्दीत फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेत सिद्दकींचा खून करण्यात आला. (network of seven hundred shooters enmity with Salman Khan How is the Bishnoi gang responsible for baba siddiqui's murder)
या प्रकरणात पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावं आहे. धर्मराज हा तर अवघ्या १९ वर्षांचा आहे. तिसरा आरोपी शिवा हा घटनास्थळावरुन फरार झाला, त्याचा आता पोलीस शोध घेतायेत. बाबा सिद्दीकी यांची सुपारी देऊन खून झाला असा पोलिसांना संशय आहे. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहीत त्यांनी ही जबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये सलमान खानचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
१४ एप्रिलला सलमान खानच्या गलक्सी या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला होता. यावेळी देखील बिश्नोई गँगचं नाव समोर आलं होतं. आता ही बिश्नोई गँग नेमकी आहे कोण, तिहार जेलमध्ये असलेला लॉरेन्स बिश्नोई ही गँग कशी चालवतो आणि सलमानशी त्यांचं वैर का आहे हे सगळं समजून घेऊयात.
हेही वाचा : Gangster Lawrence Bishnoi: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज अभिनेता लॉरेन बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये पहिल्या नंबरवर
बिश्नोई गँगचा म्होरक्या असलेला लॉरेन्स बिश्नोई सध्य तिहार जेलमध्ये आहे. लॉरेन्सचा जन्म १९९३ मध्ये पंजाबमध्ये झाला. सुरुवातीच्या काळात तो अबोहारमध्ये राहिला. मग पुढील शिक्षणासाठी तो चंदीगढच्या डीएव्ही कॉलेजमध्ये गेला. त्याने पंजाब विद्यापीठाची स्टुडंट काउंसिलमध्ये सहभाग घेतला. तिथे त्याची ओळख गोल्डी ब्रारशी झाली. बिश्नोई आणि ब्रार हे विद्यापीठाच्या राजकारणात सक्रीय झाले विद्यीपाठात त्यांनी अनेक गुन्हेगारी कृत्य देखील केली.