Palghar: नातवाने घेतला आजीचाच जीव, कारण फक्त ती म्हणाली; पोरा…
नातू रोज दारू पिऊन घरी येत होता म्हणून आजीने त्याला तू दारु पिऊ नकोस असं सांगताच त्याचा त्याला राग आला. त्यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि नातवाने थेट आजीवरच हल्ला केला.
ADVERTISEMENT

Palghar Crime : पालघर जिल्ह्यात एका वृद्धेची हत्या (Killing an old woman) झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नातवानेच आजीची हत्या केल्याने चर्चेला उधाण आले आहे. कारण नातू घरी जेवायला आल्यावर तिने त्याला काही उपदेश केला, त्याचा नातवाला राग आल्याने त्याने थेट लाकडाच्या दांडक्याने तिच्यावर हल्ला केला. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना शेजाऱ्यांना समजताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पंचनामा करून नातवाला अटक केली आहे. (Palghar district grandmother was killed by her grandson attacked on the head with wooden stick)
दारूच्या नशेत हल्ला
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जव्हार तालुक्यातील उमरवाडीमध्ये सोमवारी रात्री महिलेची हत्या झाल्याची घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना समजलं की, वृद्ध महिलेची हत्या ही नातवाने दारूच्या नशेत केली आहे. तो जेव्हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला होता.
हे ही वाचा >> ‘PM मोदींनी रामासाठी उपवास केला, पण…’, उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं
दारूवरून वाद
नातू दारू पिऊन घरी आला त्यावेळी आजी त्याला दारू पिऊ नकोस असं सांगत होती, मात्र त्याचा त्याला राग आला आणि त्याने थेट आजीला लाकडाच्या दांडक्याने माराहाण करायला सुरुवात केली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याचेही पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपी धर्मवीर वाझेला अटक करून पुढील तपास चालू केला आहे.आरोपी धर्मवीर वाझे हा 23 वर्षाचा युवक दारुच्या आहारी गेला होता, त्यामुळे त्याची आजी त्याला वारंवार दारू पिऊ नको असं सांगत होती. त्यावरूनच त्या दोघांमध्येही सारखे वाद होत होते. सोमवारीही तो दारू पिऊन घरी जेवायला आला होता.
आजीचा उपदेश
त्यावेळी त्याच्या आजीने त्याला पुन्हा उपदेश द्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या धर्मवीर वाझेने आजीवर लाकडाच्या दांडक्याने वार केले. यावेळी आजीच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ती नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
नातवाल ठोकल्या बेड्या
लाकडाच्या दांडक्याने मारहाण करून आनंदी तोखरे या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातवाला अटक करून तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांना समजलं की, तो रोज दारू पिऊन घरी येत होता, त्यावरून त्या आजी आणि नातवामध्ये वाद होत होता. सोमवारीही तो दारू पिऊन आल्यानंत त्याच्या दारू पिण्यावरून आजीने त्याला उपदेश केला. त्याचा राग मनात धरून त्याने जेवतानाच लाकडाच्या दांडक्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.