Pune Crime: मिनिटात खेळ खल्लास, आरोपी जवळचेच! मोहोळ आणि आंदेकरच्या हत्येचा पॅटर्न काय?
Sharad Mohol and Vanraj Andekar Murder: शरद मोहोळ आणि वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणाने पुण्यात एक नवा क्राइम पॅटर्न सुरू झाला आहे. तो नेमका काय हेच आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
काही दिवसांपूर्वी पुण्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आलेली
तशाच पद्धतीने वनराज आंदेकरची करण्यात आली हत्या
पुण्यातील गुन्हेगारी आणि हत्येचा नवा पॅटर्न पोलिसांची डोकेदुखी वाढवणारा
Sharad Mohol and Vanraj Andekar Murder Case: पुणे: पुण्यात वनराज आंदेकरची भर चौकात हत्या करण्यात आली. ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर कुटुंबातील काही जणांनी घडवून आणली. कौटुंबिक आणि प्रॉपर्टीच्या वादातून हा खून करण्यात आला असल्याचे देखील प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात वनराजच्या दोन्ही बहिणींना आणि त्यांच्या पतींना म्हणजे वनराजच्या दोन्ही दाजींना देखील अटक करण्यात आली आहे. पण काही दिवसांपूर्वी पुण्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली आहे. (pune crime game over in minutes what is exact pattern of murders of sharad mohol and vanraj andekar)
शरद मोहोळची हत्या आणि वनराजच्या हत्येत काही समानता दिसून येत आहेत. वनराजच्या हत्येच्या घटनेनंतर आता शरद मोहोळ हत्याकाडांची देखील चर्चा होते आहे. या दोन्ही हत्याकाडांमध्ये काही साम्य असल्याचं बोललं जात आहे. ते काय आहे हेच आपण जाणून घेऊया.
पुण्यातील 'हा' पॅटर्न ठरतोय सरकारची डोकेदुखी
रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर चुलत भावासह इमानदार चौकात उभा होता. यावेळी काही लोकांनी त्यांना मारहाण केली. आणि नंतर गोळीबार करण्यात आला. शिवाय कोयत्यानं देखील वार करण्यात आले. हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा राऊंड फायर केले. वनराज यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी परिसरातील लाईट घालवण्यात आली होती. आंदेकरच्या घरी काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना घराच्या जवळच घडली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Vanraj Andekar: बहिणींनीच भावाची सुपारी दिली, दाजींनी असा केला वनराजचा गेम... Inside स्टोरी!
शरद मोहोळ प्रकरणात देखील असंच काहीसं झालेलं होतं. शरद मोहोळची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालत होते. सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही दूर गेला असेल तोच त्याच्या याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केलेली.
काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा गेम ओव्हर झाला. यातील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी काही वेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Vanraj Andekar Murder CCTV: माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा खून नेमका झाला कसा? हादरवून टाकणारा Video आला समोर
इकडे वनराजला सख्या बहिणीने 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी दिली होती. वनराजला आपल्यावर हल्ला होऊ शकतो, याची जाणीव होती. त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यातच असायचा. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर हा घोळका नव्हता. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. त्याचवेळी 5 ते 6 दुचाकीवरुन 10 ते 12 हल्लेखोर आले.
ADVERTISEMENT
त्यांच्यापैकी एकाने आंदेकर याच्यावर एका पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही जणांनी कोयत्याने सपासप वार केले. त्यात आंदेकर जागेवरच कोसळला. अवघ्या एका मिनिटात झालेल्या या घटनेनंतर दुचाकीवरुन आलेले सर्व हल्लेखोर तिथून पळाले. शरद मोहोळ प्रकरणात देखील आरोपी जवळचेच होते, त्यामुळं शरद मोहोळ निवांतपणे वावरत होता. मात्र जवळच्या मानल्या जाणाऱ्यांनी त्याचा देखील गेम केला होता.
वनराज 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आला होता. वनराजची आई राजश्री आंदेकर आणि काका उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक राहिले आहेत. वनराज यांची बहीण वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या. तिकडे स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळ पत्नी स्वाती मोहोळच्या माध्यमातून राजकारणात उतरला होता. राजकारणात एन्ट्री करत स्वताला सेफ करण्याचा कदाचित त्याचा प्रयत्न असावा मात्र जे सुरक्षेला होते, त्यांनीच त्याचा पद्धतशीर गेम केला होता.
आता पुन्हा तोच सवाल आहे की, वनराजच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळीयुद्ध संपलंय की सुरु झालंय. एकूणच पोलिसांच्या आणि गृहविभागाच्या समोर हे टोळीयुद्ध रोखणं मोठं आव्हान असणार आहे.
ADVERTISEMENT