Vanraj Andekar: 'पोरं बोलावून तुला ठोकतेच', बहीण फक्त बोलली नाही... 24 तासातच भावाचा केला गेम!

निलेश झालटे

Vanraj Andekar Sister: पुण्यातील वनराज आंदेकर याचा त्याच्या बहिणीनेच कसा खून केला याची आता नेमकी माहिती समोर आली आहे. वाचा ही इनसाइड स्टोरी

ADVERTISEMENT

'पोरं बोलावून तुला ठोकतेच'
'पोरं बोलावून तुला ठोकतेच'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून वनराज आंदेकरचा खून

point

वनराज आंदेकरच्या हत्येचा FIR आला समोर

point

पुण्यातील आंदेकर टोळीचा काय आहे इतिहास?

Vanraj Andekar Murder: पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची भर चौकात हत्या करण्यात आली. ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर कुटुंबातील काही जणांनी घडवून आणली असल्याचं समोर आलं आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून हा खून करण्यात आला असल्याचे देखील प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात वनराजच्या दोन्ही बहिणींना आणि त्यांच्या पतींना म्हणजे वनराजच्या बहिणीसह दाजी, भाच्यासह 10 ते 15 जणांना अटक करण्यात आली आहे.  

रविवारी (1 सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास वनराज आंदेकर चुलत भावासह इमानदार चौकात उभा होता. यावेळी काही लोकांनी त्याच्यावर गोळीबार केला शिवाय कोयत्यानं देखील वार करण्यात आले. हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा राऊंड फायर केले. वनराजवर गोळीबार करण्यापूर्वी परिसरातील लाईट घालवण्यात आली होती.

हे ही वाचा>> Vanraj Andekar: बहिणींनीच भावाची सुपारी दिली, दाजींनी असा केला वनराजचा गेम... Inside स्टोरी!

आंदेकरच्या घरी काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला. आता या प्रकरणात वनराजचे वडील सूर्यकांत आंदेकर यांनी दाखल केलेली एफआयआर समोर आली आहे. यात वनराजच्या हत्येचा नेमका ट्रीगर पॉईंट काय होता हे लक्षात येईल. 

वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील FIR जसाचा तसा.. 

गुन्ह्याची हकीकत :- दाखल गुन्ह्यातील मयत इसम हा फिर्यादी सूर्यकांत आंदेकर यांचा मुलगा असून आरोपी क्र. ०१ ही मुलगी, आरोपी क्र. ०२ हा जावई आहे. सदर आरोपींचे दि.०१/०९/२०२४ | रोजी आकाश सुरेश परदेशी याचेशी वाद झाले होते, सदरबाबत तक्रार देणेकरीता ते समर्थ पोलीस स्टेशन येथे आले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp