आई-वडिलांसह बहिणीची कुऱ्हाडीने हत्या, पोटच्या पोरानेच का घेतला जीव?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rajasthan Crime Parents and sister killed by son due to financial shortage
Rajasthan Crime Parents and sister killed by son due to financial shortage
social share
google news

Murder Case: राजस्थानमधील नागौरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. नागौरमध्ये कुंभार गल्लीमध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षाच्या मुलाने आपल्याच कुटुंबातील तिघांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली आहे. आरोपीने आई-वडील (Mother-Father) आणि 15 वर्षाच्या बहिणीची कुऱ्हाडीने तोडून हत्या (Murder) केली आहे. त्यांची हत्या करुन तो तरुण पोलिसात हजर झाला व घडलेली घटना त्याने पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनाला पाठवण्यात आले. त्या तिघांचेही मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

झोपलेल्या जागीच तोडले

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, दिलीप सिंग हा गेल्या काही दिवसांपासून आर्थिक टंचाईचा सामना करत होता. पैशामुळे त्याचे आणि कुटुंबीयांचे अनेकदा वाद होत होते. त्या वादाच्या रागातूनच आई-वडील आणि बहिणीची त्याने हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की, घरातील व्यक्तींचे तुकडे करून तो पोलिसात हजर झाल्यानंतर त्याने पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर त्याच्या आई-वडील आणि बहिणीचा मृतदेह ताब्यात घेतले.

हे ही वाचा >> ज्या मुलांना आईसारखी माया दिली, त्यांनीच केला घात, वडिलांची निर्घृण हत्या

रक्ताच्या नात्यांची हत्या

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा घरामध्ये सगळा रक्ताचा सडा पडला होता. तर शरीराचेही तुकडे तुकडे झाले होते. आई-वडिलांची आणि बहिणीची क्रूरपणे हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी येत शेजाऱ्यांबरोबर चौकशी करून माहितीही घेण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

आर्थिक देवाण-घेवाण

पोलिसांनीसांनी सांगितले की, पादुकला पोलीस ठाण्याच्या कुंभार मोहल्लामध्ये जगदीश सिंग (45) यांची पत्नी आणि मुलगी हे सगळे घरात झोपले होते. त्यानंत त्यांचा मुलगा मोहित रात्री घरी आला. त्यावेळी घरात असलेल्या कुऱ्हाडीने त्याने तिघांवरही हल्ला करून त्यांचे तुकडे केले. त्यामध्ये त्याच्या आई-वडील आणि बहिणीचा जागीच मृत्यू झाला. या हत्याकांडा पाठीमागे आर्थिक देवाण-घेवाण असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन ते पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा >> Maval Lok Sabha : ‘महायुतीचा उमेदवार मीच’, जागावाटपा आधीच शिंदेंच्या खासदाराने केली घोषणा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT